जुन्नर परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणा नागरीकांना त्रास आहे. अनेक वेळा हे बिबटे मानव वस्तीत घुसतात. त्यात ते माणसांवर हल्लेही करतात. याच्या अनेक घटना अलिकडच्या काळात पाहीला मिळाल्या आहेत. त्यामुळे या बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त व्हावा अशी स्थानिकांची मागणी होती. जुन्नर परिसरात मोठ्या प्रमणात बिबट्यांचा वावर आहे. त्यांचा स्थानिकांना होणारा त्रास पाहाता या बिबट्यांची रवानगी गुजरातला करण्यात येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जुन्नर परिसरातील 10 बिबटे आता गुजरातच्या जामनगर येथे पाठवले जाणार आहे. तिथल्या सेंट्रल झुमध्ये त्यांना स्थलांतरित केले जाणार आहे. पुढच्या आठवड्यात ही प्रक्रिया पुर्ण केली जाईल. बिबट आणि मानव यामधील संघर्ष मिटविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. या स्थलांतराला केंद्र सरकारने परवानगी दिल्याचा दावा वन विभागाने केला आहे.
हेही वाचा - निकाला आधीच धुसफूस वाढली, भाजपमंत्र्याचा भाजप आमदारावर गंभीर आरोप
गुजरातमधील जामनगरमध्ये बिबट्याच्या वास्तव्यासाठी पोषक वातावरण आहे. बिबट्यांना कुठेही आणि कधीही स्थलांतरीत करता येत नाही. त्यासाठीही नियम अटी आहेत. त्यानुसार हे बिबटे आता गुजरातला जाणार आहेत. तिथे ज्यू बरोबर रेस्क्यू सेंटरही आहे. त्यामुळे तिथे हे बिबटे निट वावरू शकतात.
हेही वाचा - मनमाड बँक एफडी घोटाळ्याची व्याप्ती वाढली; घोटाळ्याची रक्कम साडेपाच कोटींच्यावर, एक अटक
या मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र ही तात्पूरती मलमपट्टी असल्याचे ते म्हणाले. या परिसरात 700 बिबटे आहेत अशी माहिती कोल्हे यांनी दिली. त्यामुळे उर्वरित बिबट्यांचं काय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. बिबट प्रजनन नियंत्रणाच्या दृष्टीने पाऊल उचलणं आणि माणूस संघर्ष कमी करण्यासाठी राज्य आपत्ती घोषित करण गरजेचे आहे असे ही या निमित्ताने अमोल कोल्हे म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world