
ऑपरेशन सिंदूर फत्ते करीत भारतीय सैन्याने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. तुम्ही भारतीयांवर करड्या नजरेने पाहायला तर तुमची सुटका नाही, तुमच्या घरात घुसून मारू असा सज्जड दम भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केला आहे. पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांविरोधात पुकारलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. विशेष म्हणजे या हल्लात मसूद अझहरचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानातून संभाव्य हल्ला किंवा दहशतवादी कारवाईमुळे भारतीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई शहर कायम दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिलं आहे. 26-11 चा हल्ला असो वा मुंबईत झालेला साखळी बॉम्बस्फोट असो. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बॉलिवूड आहे. देशातील महत्त्वाच्या व्यक्तींचं वास्तव्य आहे. शेअर मार्केटचं सेंटर आहे... अशा विविध टप्प्यात देशासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबईतील धोका टाळण्यासाठी मुंबईला हाय अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील विमानतळ, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याशिवाय सागरी मार्गावर पोलिसांची करडी नजर असेल. 26-11 च्या हल्ल्यात दहशतवादी सागरी मार्गातून मुंबईत शिरले होते. त्यामुळे याकडेही लक्ष असणार आहे.
नक्की वाचा - Operation Sindoorनंतर एअर इंडियाचा मोठा निर्णय, 10 मेपर्यंत 9 शहरातील सर्व उड्डाणं रद्द
याशिवाय प्रमुख शाककीय कार्यालयं, आस्थापना, गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मुंबई पोलिस, राज्य रेल्वे पोलिस दलासह अन्य यंत्रणाकडील प्रशिक्षित श्वान, बॉम्बशोधक आणि नाशक पथकांनी ठिकठिकाणी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलीस नियमितपणे 'ऑपरेशन ऑलआऊट' राबवत असते. त्यातही युद्धजन्य परिस्थितीत ही कारवाई अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार बुधवारी रात्रीदेखील ही कारवाई करण्यात आली. गेल्या दोन दिवसांत शहरात ओळख लपवून वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांची शोधमोहीम पोलिसांनी तीव्र केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world