जाहिरात

इरफानने 3 जणांना विहिरीतून जिवंत काढलं बाहेर; पिकअप वाहन अपघातात कुटुंबातील 8 जण दगावले, थरकाप उडवणारा प्रसंग

सर्व मृत व्यक्ती रांजणी गावातील असल्याची माहिती आहे. हे कुटुंब सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते.

इरफानने 3 जणांना विहिरीतून जिवंत काढलं बाहेर; पिकअप वाहन अपघातात कुटुंबातील 8 जण दगावले, थरकाप उडवणारा प्रसंग

Pandharpur News : पंढरपूरच्या म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात ८ ते ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व मृत व्यक्ती रांजणी गावातील असल्याची माहिती आहे. हे कुटुंब सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक एका विहिरीत पिकअप गाडी पडून हा मोठा अपघात घडला. साधारण साडे चारच्या दरम्यान हा अपघात घडला. 

मिळालेल्या माहितीनुसार, माळशिरस तालुक्यात तांदळवाडी गावाजवळ हा अपघात घडला. पिकअप वाहन साधारण ५० ते ६० च्या स्पीडने येत होतं.  पिकअपमध्ये एकूण १५ जणं असल्याची माहिती आहे. त्याचवेळी चालकाचं पिकअपवरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन रस्त्याजवळील विहिरीत पडली. रस्त्यापासून अवघ्या १० फुटाच्या अंतरावर ही विहीर आहे. विहिरीला कोणतीही संरक्षण भिंत नव्हती. त्यामुळे पिकअप थेट विहिरीत कोसळली. 

नक्की वाचा - मोठी बातमी! पंढरपुरात पिकअपच्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू; सिद्धनाथाचं दर्शन करुन परतताना भयंकर घडलं

इरफान मुजावरने तातडीने मारली विहिरीत उडी...

हा अपघात घडला तेव्हा इरफान मुजावर तेथे उपस्थित होता. तो पिकअपच्या पुढे वाहनाने जात होता. पिकअप वाहन साधारण ५० ते ६० च्या स्पीडने होतं. मात्र चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि पिकअप थेट विहिरीत कोसळल्याचं इरफानने सांगितलं. इरफानने सांगितलं की, मी मागे पाहतो तो पिकअप वाहन जवळील विहिरीत कोसळली. विहिरीत पिकअप वाहन कोसळताच इरफानने वडिलांना फोन करीत गावातील मुलांना तातडीने विहिरीपाशी येण्यास सांगितलं आणि एका व्यक्तीला मदतीला घेत त्याने विहिरीत उडी मारली. इरफानने तातडीने ३ जणांना विहिरीतून जिवंत बाहेर काढलं. मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप वाहन उटल्या दिशेने विहिरीत कोसळलं. त्यामुळे विहिरीवरील कापडाचा फुगा झाला आणि त्यात अनेकजण अडकल्याचं सांगितलं जात आहे. इरफानने तातडीने पाऊल उचलल्याने कुटुंबातील ३ जणांचा जीव वाचविण्यात आला. यानंतर तांदूळवाडी गावातील स्थानिक विहिरीजवळ आले. त्यातील अनेकांनी विहिरीत उडी मारत अनेकांचा जीव वाचवला. या गावातील ग्रामस्थांनी दाखविलेल्या प्रसंगावधानतेमुळे ८ जणांचा जीव वाचला आहे. 

वारंवार संरक्षण भिंतीची मागणी...

तांदळवाडी गावातील एका स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्याजवळील विहिरीच्या संरक्षक भिंतीची मागणी केली जात होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. जर वेळीत संरक्षक भिंत बांधली असली तर निष्पाप लोकांचे जीव बचावले असते अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

तांदुळवाडी अपघातातील नावं...

  1. सिद्धेश्वर पोपट जाधव – जखमी
  2. शशिकला पोपट जाधव – जखमी
  3. पूजा अमोल सातोरे
  4. अपूर्व अमोल सातोरे – जखमी
  5. आरव अमोल सातोरे – 
  6. बालाजी बावचे – जखमी
  7. बालाजी बावचेंचा लहान मुलगा
  8. संदीप बावचे
  9. ताई बावचे 
  10. पूजा बालाजी बावचे
  11. अश्विनी संदीप बावचे
  12. सार्थक संदीप बावचे
  13. संकृती संदीप बावचे
  14. गणेश बालाजी बावचे
  15. सागर चौगुले – ड्रायव्हर
संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com