
सूरज कसबे, पिंपरी-चिचवड
Pipmri Chinchwad News : पिंपरी-चिंचवडमध्ये 18 वर्षीय तरुणीची भररस्त्यात हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. दोन तरुणांनी पाठलाग करुन तरुणीची धारधार शस्त्राने वार करून हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी काही तासात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांना ही कारवाई केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात रविवारी रात्री कोमल भरत जाधव या तरुणीवर दोन इसमांनी धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेशाचा रहिवाशी असलेल्या 45 वर्षीय मुख्य आरोपी उदयभान यादव आणि त्याच्या सख्ख्या भाच्याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणी आणि आरोपी उदयभान यादव शेजारी राहत होते. दोघांमध्ये संबंध होते. यातून दोघांमध्ये काही आर्थिक व्यवहार देखील झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याच संबंधातून निर्माण झालेल्या वादामुळे आरोपींनी कट रचून कोमलची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
(नक्की वाचा- Vasai News : फिलिपिन्समध्ये पर्यटनासाठी गेलेल्या वसईतील दाम्पत्याचा अपघाती मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी उदयभानने कोलमसोबतचे संबंध आणि त्यातून झालेल्या आर्थिक व्यवहारातून तिला संपवण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्याने सख्ख्या भाच्याची मदत घेतली. दोघांना मिळून कोमलची हत्या केली.
(नक्की वाचा - Sand Mafia : संतापजनक, वाळू माफियांवर कारवाईवर गेलेल्या पोलिसाला ट्रॅक्टरने चिरडलं)
दोघांनी बाईकवरुन येत कोमलला भररस्त्यात अडवून तिच्यावर सपासप वार केले. आपली ओळख पटू नये म्हणून दोघांनीही डोक्यात हेल्मेट घातले होते. प्राथमिक तपासाअंती पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world