यू ट्यूबवर व्हिडीओ पाहून चोऱ्या करायला शिकला, एक चूक अन् करेक्ट कार्यक्रम

दुचाकी चोरून त्यातून पैसे कमवण्याचा त्याने सपाटा लावाला. सर्व काही सुरळीत असताना, पठ्ठ्याला एक चूक महागात पडली.

Advertisement
Read Time: 3 mins
पुणे:

सूरज कसबे  

घरच्यांबरोबर त्याचे भांडण झालं. त्याने रागाने घर सोडले. पुणे गाठलं. पण कमाई करण्याचं काही साधन नव्हतं. पण मौजमजेसाठी पैस हवे होते. अशा वेळी तो यू ट्यूबवर एक व्हिडीओ पाहात होता. त्यात त्याला दुचाकीचे हॅण्डल लॉक तोडून दुचाकी कशी सुरु करायची हे समजले. मग काय डोक्यात चक्र सुरू झाली. दुचाकी चोरून त्यातून पैसे कमवण्याचा त्याने सपाटा लावाला. सर्व काही सुरळीत असताना, पठ्ठ्याला एक चुक महागात पडली. अन् होत्याचं नव्हत झालं. पठ्ठ्या थेट गजाआड गेला.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 अभिषेक मल्लपा हावळेकर हा मुळचा साताऱ्याचा. त्याने घरात भांडण करून घर सोडलं. तो थेट पुण्यात पोहोचला. सहज आणि झटपट पैसे कसे कमवता येतील यावर त्याचा भर होता. त्याच्याच शोधात तो होता. त्याच वेळी त्याला यू ट्यूब वरून एक आयडीया मिळाली.तो एक व्हिडीओ पाहात होता. त्यात हॅण्डल लॉक तोडून दुचाकी कशी सुरु करायची हे दाखवले जात होते. तो व्हिडीओ त्याने वारंवार पाहीला. ते कसं करतात ते समजून घेतलं. त्यानंतर त्याने दुचाकी चोरण्याचा निर्णय घेतला. ज्या भागात सीसीटीव्ही नव्हते त्या भागात तो आधी चोऱ्या करायचा. 

ट्रेंडिंग बातमी - शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटेंनी तेव्हाच व्यक्त केली होती भीती, पण तरीही दुर्लक्ष?

हे करत असताना त्याने एक सहकारीही पकडला होता. तो अल्पवयीन होता. या दोघांनी दुचाकी चोरण्याचा सपाटा लावला. पिंपरी चिंचवड शहरातून एक दोन नव्हे तर तब्बल 18 मोटारसायकली चोरीला गेल्या. एकामागून एक तक्रारी पोलीसांकडे आल्या. चोरींच्या या घटनांमुळे पोलीसांसमोरही मोठे आव्हान उभे ठाकले. हिंडवडी पोलीस स्थानकात दोन मोटारसायकल चोरींची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचा तपास पोलीस करत होते. त्यावेळी पोलीसांनी जवळपास 70 ते 80 सीसीटीव्ही फुटेज तपासले. 

ट्रेंडिंग बातमी - 'पुतळा बनवणारे ठेकेदार, शिल्पकार मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले'

हे सीसीटीव्ही तपासत असताना पोलीसांच्या हाती एक महत्वाचा धागा लागला. या फुटेजमध्ये एक अल्पवयीन मुलगा गाडी जवळ दिसला. पोलीसांनी सापळा रचून या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने अभिषेक मल्लपा हावळेकर याचं नाव सांगितलं. पिंपरी चिंचवड पोलीसांच्या गुन्हे शाखा चारच्या पथकाने त्याचा शोध घेत त्याला अटक केलीय . त्याच्या अटकेने शहरातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्या कडून तब्बल 8 लाख 90 हजार रुपये किंमतीच्या 18 मोटर सायकली जप्त केल्या आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलिस उप आयुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत यांच्या सह मयुरेश साळुंखे, नारायण जाधव ,संजय गवारे,आदिनाथ मिसाळ,प्रवीण दले व अन्य पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी केलीय. मुख्य चोर असलेल्या अभिषेक याचा अल्पवयीन साथिदारामुळे तो पकडला गेला. 

Advertisement