
Political News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निधीवाटपावरुन मित्रपक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने टीका होताना दिसत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवारांच्या बाजूने जोर लावताना कुणीही दिसत नाहीये. यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित पवारांच्या पक्षात अजित पवारांवर टीका झाली की कुणीच पुढे येत नाही. मात्र अजित पवारांच्या व्यतिरिक्त जर कोणत्या नेत्यावर टीका झाली तर त्यांच्या पक्षातील लोकं तुटून पडतात. अजित पवार पक्षात एकटे पडले आहेत, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. अशावेळी एका पवारांना साथ द्यायला दुसरे पवार जातील का? या प्रश्नावर बोलताना रोहित पवार यांनी म्हटलं की, त्यांच्या पक्षात देखील पवार आहेत. सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार आहेत.
(नक्की वाचा- विकासनिधी देत नसल्याच्या तक्रारी; अजित पवारांच्या उत्तराने भाजप-शिवसेना आमदारांची कोंडी)
अजित पवार कारखाना निवडणुकीत देखील लक्ष घालत आहेत, यावर बोलताना रोहित पवार यांनी म्हटलं की, अजित पवार एकटे पडलेत म्हणून त्यांना प्रत्येक निवडणुकीत लक्ष घालावं लागत आहे. त्यांच्या पक्षातील दुसरी तिसरी फळी कुठे आहे हा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचे नेते काय करत आहेत? उद्या अजित पवारांना ग्रामपंचायत निवडणुकीत देखील लक्ष घालाव लागेल, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
(नक्की वाचा- - 'रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का?',अंधारे-चाकणकर यांच्यात जुंपली, एकमेकींना थेट...))
आम्ही कारखाना निवडणुकीत का नाही, याबाबत मी बोलणार नाही. कारण माझ्यावर पक्षाची आता कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. माझ्या माहितीनुसार 13 तारीख अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. त्यामुळे आमचा पैनल निवडणुकीत नाही असं अजिबात म्हणता येणार नाही. सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार मिळून एक पॅनेल उभा करत आहेत, अशी माहिती देखील रोहित पवार यांनी यावेळी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world