नागपूर हिट अँड रन प्रकरण; बावनकुळेंच्या मुलाचं नाव समोर आल्याने राजकारण तापलं!

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या सातत्याने या घटनेवरून भाजपवर निशाणा साधत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजप आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना धारेवर धरलं आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

संजय तिवारी, नागपूर

नागपूरमध्ये हिट अँड रनचं प्रकरण सोर आलं आहे. रविवारी मध्य रात्री नागपूरमध्ये एका भरधाव ऑडी कारने तीन ते चार गाड्यांना धडक दिली. मात्र चालकाने गीड न थांबवता मानकापूर ब्रिजच्या दिशेने गेली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे देखील गाडीत असल्याचं बोललं जात आहे. या घटनेवरुन विरोधकांनी भाजपची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या सातत्याने या घटनेवरून भाजपवर निशाणा साधत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजप आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना धारेवर धरलं आहे. 

(नक्की वाचा -  नागपूरमध्ये भरधाव ऑडी गाडीची अनेक गाड्यांना धडक, गाडी भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाची)

नाना पटोले यांनी ट्वीट करत म्हटलं की, "नागपुरात हिट अँड रन प्रकरणात भाजपच्या बड्या नेत्याचा प्रताप समोर आला आहे. पठ्ठ्यानं एका गाडीला, दोन दुचाकींना धडक दिली. पण आता ना त्या बारचा सीसीटीव्ही ताब्यात ना अटकेची कारवाई. कारण, या युवराजांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न होत आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था पुन्हा भाजपच्या दावणीला बांधलेली आहे, हे दिसून आलं. श्रीमंतांसाठी काम करणाऱ्या या सरकारला गरिबाच्या जीवाची किंमत नाही. गरिबाचा जीव गेला तरी यांना काय? गृहमंत्री फडणवीसांच्या गृहखात्याचा धाक त्यांच्याच पक्षातल्यांना नाही."

सुषमा अंधारे यांनी याबाबत ट्वीट करत म्हटलं की, ऑडीमध्ये संकेत बावनकुळे होता असे आता पोलीस अधिकारीच सांगत आहेत. बावनकुळे साहेब अजूनही आपल्याला संकेतला वाचवायचे सगळे प्रयत्न करायचे आहेत का? निष्पक्ष चौकशी करायची तर संकेत वर गुन्हा दाखल व्हायलाच हवा. 

(नक्की वाचा -  Pune Hit and Run : पुण्यात आणखी एक हिट अँड रन; मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू)

काय आहे प्रकरण? 

नागपूरच्य सीताबर्डी भागात हिट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. एका भरधाव ऑडी कारने काही गाड्यांना धडक दिली.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळाजवळ असलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गाडी चालवत असलेल्या मुलांना गाडी बाहेर काढले आणि चोप दिला. नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही गाडी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात झाल्यानंतर गाडीची नंबरप्लेट लपवण्यात आली होती. गाडीतील दोघांनी धरमपेठ परिसरात मद्यप्राशन केलं. त्यानंतर ते भरधाव गाडी चालवत निघाले होते. त्या दरम्यान ही घटना घडली. 

Topics mentioned in this article