Adani Airport Holdings Limited AAHL : अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL)या भारतातील सर्वात मोठ्या खासगी एअरपोर्ट ऑपरेटरला आर्किटेक्चर आणि डिझाइन क्षेत्रातील जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार प्रिक्स व्हर्सायल्सकडून जागतिक मान्यता मिळाली आहे.कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) आणि गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (एलजीबीआयए)टर्मिनल 2 ने 2026 मधील जगातील सर्वात सुंदर विमानतळांच्या यादीत (वर्ल्ड्स मोस्ट ब्युटिफल एअरपोर्ट्स लिस्ट 206)स्थान मिळवले आहे.ही मान्यता उत्कृष्ट डिझाइन,शाश्वतता आणि प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या नियोजनाचा गौरव करते.
या पाच आंतरराष्ट्रीय विमानतळांचाही गौरव
प्रिक्स व्हर्सायल्स हा आर्किटेक्चर आणि डिझाइन क्षेत्रातील एक प्रतिष्ठित वार्षिक जागतिक पुरस्कार आहे.2015 पासून पॅरिसमधील युनेस्कोच्या मुख्यालयात याचे सादरीकरण केले जाते.हा पुरस्कार नवनवीन सुरू झालेल्या विमानतळांना आणि टर्मिनल्सना दिला जातो.ज्यांच्या समकालीन रचनांमधून वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेचा (आर्किटेक्चर) दुर्मिळ संगम दिसून येतो.विमानतळ केवळ पारंपारिक डिझाइनच्या पलीकडे जाऊन जगाला समृद्ध आणि सुसंवादी दृष्टिकोन देऊ शकतात,हे यातून दिसून होते.या यादीत एनएमआयए आणि एलजीबीआयएसोबत चीनमधील ग्वांगझू,जर्मनीमधील फ्रँकफर्ट अॅम मेन,कंबोडियामधील कंदाल स्टुँग,युनायटेड स्टेट्समधील पिट्सबर्ग आणि युनायटेड स्टेट्समधील सॅन दिएगो या इतर पाच आंतरराष्ट्रीय विमानतळांचाही गौरव करण्यात आला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 ला त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कमळाच्या फुलापासून प्रेरित आर्किटेक्चर,भविष्यकालीन डिझाइन शैली आणि तंत्रज्ञान,कला व कार्यक्षमतेच्या उत्कृष्ट संयोजनासाठी मान्यता मिळाली आहे,जे आधुनिक जागतिक अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या वाढत्या आकांक्षांना प्रतिबिंबित करणारे एक जागतिक दर्जाचे गेटवे ठरत आहे. गुवाहाटीचे लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दक्षिण आणि आग्नेय आशियाच्या चैतन्यमय महत्त्वाच्या वळणावर वसलेले आहे आणि ईशान्य भारतासाठी ऐतिहासिक व भव्य प्रवेशद्वार म्हणून काम करते.
नक्की वाचा >> Shirdi News: शिर्डीत नव्या भोंदूबाबा अशोक खरातला अटक, सांगलीच्या कपलला आला भयानक अनुभव, सर्व कारनामे उघड
सपांदकीय सारांश
अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडच्या अंतर्गत येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही विमानतळांचा प्रिक्स व्हर्सायल्सच्या 2026 च्या जगातील सर्वात सुंदर विमानतळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.हा पुरस्कार उत्कृष्ट डिझाइन,नाविन्यता,शाश्वतता,सांस्कृतिक ओळख आणि प्रवाशांचा उत्तम अनुभव यांना सन्मानित करतो.या जागतिक मान्यतेमधून देशाचा विकास, पर्यटन आणि प्रादेशिक प्रगतीला गती देणारे जागतिक दर्जाचे विमानतळ उभारण्यावरील एएएचएलचे उद्दिष्ट दिसून येते.
हा प्रदेश आपल्या विहंगम पर्यावरणीय विविधता आणि समृद्ध स्थानिक वारशासाठी जगभर प्रसिद्ध आहे.या विमानतळाच्या टर्मिनल २ ची स्थापत्य शैली 'बांबू ऑर्किड'च्या निसर्गप्रेमी आणि आकर्षक सौंदर्याने प्रेरित आहे.जी अत्यंत कार्यक्षम आणि शाश्वत संरचनेच्या माध्यमातून या प्रदेशातील समृद्ध जैवविविधतेला सन्मानित करते.“आमच्या विमानतळांना जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली पाहून आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे.आम्ही भारताला जगातील आघाडीच्या विमानचालन बाजारपेठांमध्ये स्थान मिळवून देणारे जागतिक दर्जाचे अनुभव देण्याबाबत कटिबद्ध आहोत.
नक्की वाचा >> तिच तारीख, तिच पद्धत; संचिता उगलेचा संबंध सुशांत सिंहच्या मृत्यूशी का जोडला जातोय? भावाचा धक्कादायक आरोप
अदाणी एअरपोर्ट्समध्ये आम्ही विमानतळांना व्यक्ती आणि प्रदेशांना जोडणारे महत्त्वाचे दुवे मानतो.प्रिक्स व्हर्सायल्सद्वारे एनएमआयए आणि गुवाहाटी विमानतळ या दोन्ही विमानतळांचा झालेला हा गौरव म्हणजे कार्यक्षमता,शाश्वतता आणि परिचालन कार्यक्षमता राखत सर्वोत्तम स्थापत्य कौशल्यासह पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या आमच्या उद्दिष्टाची पावती आहे,”असे अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे प्रवक्ता म्हणाले.
प्रिक्स व्हर्सायल्स पुरस्कारांचा मुख्य उद्देश बुद्धीमान शाश्वततेला चालना देणे आहे.जिथे संस्कृती पर्यावरणाची सेवा करण्यासोबत त्या संकल्पनेच्या पलीकडे जाते.दरवर्षी जाहीर होणाऱ्या या पुरस्कारांमध्ये,2026 च्या यादीतील तीन विमानतळांना किंवा विमानतळ टर्मिनल्सना वर्षाच्या शेवटी वर्ल्ड टायटल (प्रिक्स व्हर्सायल्स,इंटिरियर किंवा एक्सटिरियर) देऊन सन्मानित केले जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world