जाहिरात

Pune News: पुण्यात 'या' तारखेपासून 14 दिवस जमावबंदी, कोण कोणत्या गोष्टींवर असणार बंदी?

पुणे शहरात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे मोर्चे,आंदोलने आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 9 जूनपासून पुढील 14 दिवस पुन्हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

Pune News: पुण्यात 'या' तारखेपासून 14 दिवस जमावबंदी, कोण कोणत्या गोष्टींवर असणार बंदी?
Section 144 In Pune City Latest News
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Section 144 In Pune :  शहरात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे मोर्चे,आंदोलने आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 9 जूनपासून पुढील 14 दिवस पुन्हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. शहरात सार्वजनिक शांतता व सुरक्षा अबाधित राहावी,यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त डॉ.प्रशांत अमृतकर यांनी हा आदेश काढला आहे.9 जून रोजी मध्यरात्री 1 वाजल्यापासून  22 जून  मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील.जमावबंदी आदेशानुसार,पोलीस आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र सभा घेणे अथवा मिरवणुका काढण्यावर बंदी असेल.हा आदेश शासकीय सेवेतील कर्तव्यासाठी हत्यार बाळगणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही.याशिवाय,खासगी सुरक्षा रक्षक,गुरखा किंवा चौकीदार यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

नक्की वाचा >>Solapur News: सोलापूर रेल्वे स्थानकात मोठी दुर्घटना टळली, काही प्रवासी जखमी, नेमकं काय घडलं?

या गोेष्टींवर राहणार बंदी

कोणताही स्फोटक अथवा ज्वलनशील द्रव पदार्थ सोबत नेण्यास सक्त मनाई असेल.तलवार,भाले,सोटे,बंदुका,काठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी हत्यारे सोबत बाळगता येणार नाही.कोणत्याही व्यक्ती,नेत्यांच्या प्रतिमा,चित्रे किंवा प्रतीकात्मक प्रेताचे प्रदर्शन करणे व त्याचे दहन करण्यास मनाई असेल.

सार्वजनिक ठिकाणी अर्वाच्च घोषणा देणे, गाणी गाणे किंवा वाद्य वाजवणे यावर निर्बंध असतील.सभ्यता आणि शालीनतेच्या विरोधात असणारे फलक, चिन्हे किंवा चित्रे तयार करणे व त्यांचे प्रदर्शन करण्यास बंदी आहे. शांतता भंग होईल अशी प्रक्षोभक भाषणांवर मनाई करण्यात आली आहे.

नक्की वाचा >> Pune News: विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात बोगस इंटिग्रेटेड कॉलेजचा पर्दाफाश, विद्यार्थ्यांना बसला मोठा फटका

पोलीस प्रशासनाने दिला मोठा इशारा

गुन्हेगारांचे किंवा गुन्हेगारी कृत्यांचे उदात्तीकरण करणारी व्हिडिओ 'रिल्स'बनवून ती समाजमाध्यमांवर पोस्ट करणे,त्याद्वारे समाजात दहशत पसरवणे अथवा कोणाला धमकावणे या कृत्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com