जाहिरात

बांगलादेशात हिंदूवरील अत्याचाराविरोधात रामगिरी महाराजांच्या उपस्थितीत न्याय मोर्चा; मुस्लीम संघटनांची पोलिसात धाव

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आंदोलन होणार आहे. सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल. ज्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते, हिंदू संघटना सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे महंत रामगिरी महाराज या आंदोलनात मार्गदर्शन करणार आहे. 

बांगलादेशात हिंदूवरील अत्याचाराविरोधात रामगिरी महाराजांच्या उपस्थितीत न्याय मोर्चा; मुस्लीम संघटनांची पोलिसात धाव

बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदू जनजागरण समितीतर्फे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी 10 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी महंत रामगिरी महाराज हे मार्गदर्शन करणार आहेत. तर दुसरीकडे रामगिरी महाराज यांनी आजच्या आंदोलनात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करू नयेत यासाठी मुस्लीम संघटनांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. त्यामुळे आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याचा आरोप होत आहे. याबाबतचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बांगलादेशमधील या सर्व परिस्थितीचे पडसाद भारतात देखील पाहायला मिळत आहेत. कारण बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. दरम्यान आज छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आंदोलन होणार आहे. सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल. ज्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते, हिंदू संघटना सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे महंत रामगिरी महाराज या आंदोलनात मार्गदर्शन करणार आहे. 

(नक्की वाचा-  CCTV Footage : कुर्ल्यात भरधाव बेस्ट बस गर्दीत शिरली, 5 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी)

वादग्रस्त वक्तव्यामुळे आले चर्चेत

काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराज यांनी मुस्लीम धर्माचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे देशभरात रामगिरी महाराज यांच्या विरोधात आंदोलनं झाली. 60 पेक्षा अधिक ठिकाणी पोलिसात तक्रार देऊन गुन्हे दाखल करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अनेक आंदोलन झाली. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संभाजीनगर ते मुंबई रॅली काढली होती. तर आजच्या आंदोलनात रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नये, अशी मागणी करणारे निवेदन मुस्लीम संघटनांकडून पोलीस आयुक्त यांना देण्यात आले आहे.

(नक्की पाहा-  कुर्ल्यातील अपघाताची भीषणता दाखवणारे Photos)

आंदोलनात असा असणार पोलीस बंदोबस्त

  • 2 पोलीस उपायुक्त
  • ३ एसीपी
  • 15 पोलिस निरीक्षक
  • 40 पीएसआय, एपीआय 
  • 240 अंमलदार
  • 6 ड्रोन कॅमेरे 
  • दंगा काबू पथक 
  • 10 राखीव स्ट्रायकिंग फोर्स  
  • गुन्हे शाखा
  • विशेष शाखेचा बंदोबस्त

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com