जाहिरात

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; महत्त्वाच्या कामाला सुरुवात

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या रिंगरोडच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे.

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; महत्त्वाच्या कामाला सुरुवात

सूरज कसबे, प्रतिनिधी  
 

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या रिंगरोडच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. राज्य रस्तेविकास महामंडळाच्या वतीने 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीच्या ह्या रिंगरोडचे काम सुरू करण्यात आले आहे. नऊ कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेत अडीच वर्षांत काम पूर्ण करण्याचे निश्चित करून ह्या कामाला सुरूवात केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुमारे 42 हजार कोटी रुपयांच्या ह्या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले असून दोन्ही भागातील जमिनीचे पूर्ण संपादन ही करण्यात आले आहे, या कामाचे पूर्व भागात सात तर पश्चिम भागात पाच टप्पे करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील वाडेबो-हाई, खडकवासला, सिंहगड, मुळशी, उर्से, चाकण ,हिंजवडी, सोरतापवाडी या ठिकाणी एकत्रित कामाला सुरूवात झाली आहे.

Pune Sinhagad Fort : विकेंडला सिंहगडावर जाताय? मग ही बातमी वाचाच, प्रशासनाचा मोठा निर्णय

नक्की वाचा - Pune Sinhagad Fort : विकेंडला सिंहगडावर जाताय? मग ही बातमी वाचाच, प्रशासनाचा मोठा निर्णय

दरम्यान या रिंगरोडच्या कामात अनेक ठिकाणी बदल करण्यात आले असून भंडारा डोंगर या ठिकाणी सुरू असलेल्या कामात सुद्धा बदल करण्यात आला आहे. या कामाच्या बदलाच्या आईलमेंट चे सादरीकरण एम पी सी कमिटी कडे करून त्याची मान्यता घेणे आवश्यक असताना ही मान्यता घेण्यात आली नसल्याने ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून याबाबतचे निवेदन राज्य रस्ते विकास महामंडळाला देणार असल्याचे एम पी सी कमिटीचे सदस्य वसंत भसे यांनी म्हटले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com