
Pune News : पुणे शहराच्या विकासासाठी, नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी पुणे महानगरपालिकेची चोख व्यवस्था आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची काळजी घेण्यासाठी यंत्रणा देखील पुणे महापालिकेकडे आहे. म्हणूनच पुणे महापालिकेने रस्त्यांची दुरावस्था होऊ नये, रस्त्यांवरील खड्डे, चेंबर्स, फूटपाथ दुरुस्ती यांच्या देखभालीकडे लक्ष देण्यासाठी पुणेकरांची मदत घेण्याचे ठरवले आहे. यासाठी पुणेकर मोबाईल क्रमांक, व्हॉट्सअॅप क्रमांक देखील पुरवले आहेत. याद्वारे नागरिक आपल्या परिसरातील रस्त्यांबाबतच्या तक्रारी महापालिकेकडे करू शकतात.
(नक्की वाचा- Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! सप्टेंबरपर्यंत पुणे मेट्रो लाईन 3 चा 13 किमीचा टप्पा सुरू होणार)
पुणे महापालिकेने वर्तमानपत्रात जाहीरात देत म्हटलं की, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते सुस्थितीत राहण्याकरिता प्रशासनाकड़ून दक्षता घेतली जात आहेच. तथापि, शहरातील कुठल्याही रस्त्यावर पडलेले खड्डे, समपातळीत नसलेले चेंबर्स, फुटपाथ दुरुस्ती व पावसाचे पाणी साचणारा भाग इत्यादी रस्त्याच्या विषयक समस्याबाबत महापालिकेच्या पथ विभागाकडे नागरिकांना विविध माध्यमातून तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
पुणेकरांना कुठे तक्रार करता येणार?
- फोन नंबर. 020-25501083
- 24X7 भरारी पथक- 9049271003
- WhatsApp/SMS : 9689900002
- WhatsApp BOT-8888251001
- फेसबुक, गुगल+: /pmcpune
- ट्विटर : @pmcpune
- मोबाईल अॅप : Play Store and App Store/PuneConnect
- वेबसाईट : www.complaint.pmc.gov.in/pmccare.in
- ई-मेल : feedback@punecorporation.org
- कॉल सेंटर : Toll Free No. : 1800 1030 222
- मोबाईल अॅप: PuneConnect/pmccare
(नक्की वाचा- Onioin Farmer: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलास मिळणार? राज्याची केंद्राकडे मोठी मागणी)
वरील सर्व माध्यमातून पथ विभागाकडून तक्रार निवारणाची कार्यवाही केली जाते. तरी नागरिकांनी आपल्या पुणे शहराचा सुनियोजित व गुणवत्तापूर्ण सुविधायुक्त शहर हा नावलौकिक कायम राखण्यासाठी वरील तक्रार निवारण प्रणालीचा सुयोग्य वापर करून पुणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world