जाहिरात

Pune News: तोंडाला रुमाल, हातात कोयते, कॅफे बाहेरच वाहनांची तोडफोड

विशेष म्हणजे या घटनेला 3 दिवस झाल्यानंतर सुद्धा याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात ना कुठली तक्रार, ना कुठला गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Pune News: तोंडाला रुमाल, हातात कोयते, कॅफे बाहेरच वाहनांची तोडफोड
पुणे:

हातात कोयते, तोंडाला रुमाल बांधून तीन तरुणांनी पुण्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या तरुणांनी केलेल्या या कृत्यामुळे पुन्हा एकदा कोयता गँगची आठवण पुणेकरांना झाली आहे. पुण्यातील डी पी रोडवर रात्री उशीरा ही घटना घडली. एका कॅफेच्या बाहेर तीन तरुणांनी कोयत्या सारखं हत्यार नाचवत वाहनांची तोडफोड केली. त्यातून त्यांनी दहशत माजवल्याचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्री 12 वाजता हा सगळा प्रकार घडला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विशेष म्हणजे या घटनेला 3 दिवस झाल्यानंतर सुद्धा याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात ना कुठली तक्रार, ना कुठला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा सगळा प्रकार नेमक्या कुठल्या वादातून घडला हे अद्याप समजू शकलेले नाही. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 27 मे रोजी रात्री 12 वाजता पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या डी पी रोडवरील रस्त्यावर एक कॅफे उशिरापर्यंत सुरू होता. अचानक तिथे तीन तरुण एका दुचाकीने आले. 

ट्रेंडिंग बातमी - Vaishnavi Hagawane: 'लेकीच्या मृत्यूनंतर ही तिच्यावर शिंतोडे का?', वैष्णवीचे वडील ढसाढसा रडले

त्यावेळी त्यांच्या तोंडावर रुमाल आणि हातात कोयता होता. ही सर्व घटना सी सी टीव्हीमध्ये कैद झाली आहे. तीन तरुण हातात हत्यार घेऊन आले. त्यानंतर ते कॅफेमध्ये शिरले. त्यानंतर दिड मिनिटात ते बाहेर आले. बाहेर येताच त्यांनी हातातील हत्यारे नाचवली. पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकीवर हल्ला केला. या घटनेत सुदैवाने कोणी ही जखमी झाला नाही. या घटनेला आता 3 दिवस उलटले आहेत. पोलिसांनी याबाबत कुठली कारवाई केली आहे का? या प्रकरणी अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे का? कॅफे चालकाने संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे का, याबाबत कुठली ही माहिती समोर आलेलेली नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com