CCTV Footage : एका वडापावमुळे गेले 5 लाखांचे दागिने, पुण्यात वृद्ध दाम्पत्यासोबत काय घडलं?

वृद्ध दाम्पत्य बँकेतून परतत असताना चोरट्यांनी डाव साधला. वृद्ध दाम्पत्य स्कुटीवरून बँकेतून घरी निघाले होते. मात्र वाटेत वडा-पाव खायला थांबले.

जाहिरात
Read Time: 1 min

CCTV Footage : पुण्याच्या हडपसरमध्ये भरदिवसा चोरीची घटना समोर आली आहे. एका वृद्ध दाम्पत्याचे पाच लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लुटले आहेत. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे वृद्ध दाम्पत्य बँकेतून परतत असताना चोरट्यांनी डाव साधला. वृद्ध दाम्पत्य स्कुटीवरून बँकेतून घरी निघाले होते. मात्र वाटेत वडा-पाव खायला थांबले. त्यासाठी त्यांनी आपली स्कूटी रस्त्यावर उभी केली. महिला स्कूटीजवळच उभी होती. तर त्यांचे पती जवळच्या दुकानात वडा-पाव घेण्यासाठी गेले होते.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

(नक्की वाचा - 'माफ कर आई, मी तुझी हत्या केली' लेकानं आईचा खून केला अन्...)

त्याचवेळी एका पांढरा शर्ट घातलेल्या चोरट्याला संधी साधून स्कूटरवर ठेवलेली बॅग चोरून पळ काढला. त्यावेळी आजूबाजूचे अनेक लोक तेथे जमले. मात्र चोर काही वेळातच पसार झाल्याने त्यांना काहीच करता आले नाही. वृद्ध दाम्पत्याच्या तक्रारीवरुन पोलीस तपास करत आहेत. 

Advertisement

Topics mentioned in this article