जाहिरात

Pune News: 30 वर्षानंतर पुण्यात डबलडेकर बस, कुठे कुठे धावणार? जाणून घ्या सगळी माहिती

Pune Double Decker PMPML Buses: 30 वर्षांपूर्वी पुण्यात डिझेलवर धवणाऱ्या डबल डेकर बस होत्या, मात्र नंतर त्या बंद झाल्या. 

Pune News:  30 वर्षानंतर पुण्यात डबलडेकर बस, कुठे कुठे धावणार? जाणून घ्या सगळी माहिती
पुणे:

सूरज कसबे

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील वाढत्या लोकसंख्येवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.  शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा प्रभावी आणि अत्याधुनिक बनविणे हा त्यापैकीच एक महत्त्वाचा पर्याय आहे. PMPML च्या बसेस पुण्यातील रस्त्यांवर धावत असतात, मात्र त्या अपुऱ्या पडताना दिसतात. यामुळे पुण्यात पुन्हा एकदा डबल डेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) सप्टेंबर महिन्यापासूनच डबल डेकर बसेसची चाचणी सुरू केली होती. पुण्यातील महत्त्वाचे आणि अधिक प्रवासी असणारे मार्ग लक्षात घेऊन त्या मार्गांवर डबल डेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बसेसची उंची जास्त असल्याने हे मार्ग निवडत असताना त्यांना कोणता अडथळा निर्माण होणार नाही हे देखील लक्षात घेणे गरजेचे होते.  डबल डेकर बसच्या चाचणी धावेसाठी शहराचे चार प्रमुख मार्ग निवडण्यात आले आहेत. ज्यात आयटी हब, एअरपोर्ट आणि मेट्रो स्टेशनवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आल्याचे दिसते आहे.  

नक्की वाचा: मध्य रेल्वेचा मोठा दिलासा! दोन नवी स्टेशन आणि 20 अतिरिक्त लोकल लवकरच सेवेत, वाचा संपूर्ण प्लॅन

PMPML ने 'स्विच मोबिलिटी' (Switch Mobility) या कंपनीच्या या बसेस असून या कंपनीचे पदाधिकारी देखील चाचणीच्यावेळी उपस्थित होते. एकाचवेळी 100 अधिक प्रवाशांना घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या या बसेसमुळे वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवणे आणि नागरिकांना खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीकडे वळवणे शक्य होईल असे पुणे महानगर परिवहन महामंडळाला वाटते आहे.

नक्की वाचा: दसऱ्यानंतरही पावसाचे सीमोल्लंघन नाही, 5 ऑक्टोबरपर्यंत पुण्याला झोडपून काढणार

कोणत्या मार्गांवर धावेल डबल डेकर बस? (Pune Double Decker Bus Route) 

  1. सर्वाधिक वाहतूक असलेले आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सोय लक्षात घेऊन चाचणी धावेसाठी रस्ते निश्चित करण्यात आले आहे. यानुसार या AC इलेक्ट्रिक डबल डेकर बसेसची चाचणी खालील चार महत्त्वाच्या मार्गांवर घेतली जात आहे:
  2. हिंजवडी फेज ते हिंजवडी फेज (वर्तुळ मार्गी): या मार्गावर हिंजवडीतील आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळेल
  3. रामवाडी मेट्रो स्टेशन ते खराडी: रामवाडी मेट्रो स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांना खराडीपर्यंत थेट आणि आरामदायी कनेक्टिव्हिटी मिळेल.
  4. मगरपट्टा सिटी ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन: मगरपट्टा सिटी आणि कल्याणीनगर मेट्रो स्टेशन दरम्यान धावणारी ही बस अनेक प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल.
  5. पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ मार्गे विमाननगर: पुणे रेल्वे स्टेशन आणि लोहगाव विमानतळादरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल.

काय आहेत पुण्यातील डबल डेकर बसची वैशिष्ट्ये ? (Pune Double Decker Bus Features) 

25 ते 30 वर्षांनंतर पुणे शहरात धावणारी ही डबल डेकर बस पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित आहे. एका बसची अंदाजित किंमत सुमारे 1.8 कोटी रुपये असून, ती एका फेरीत सुमारे 100  प्रवाशांना घेऊन जाऊ शकते. लंडनच्या प्रसिद्ध लाल बसेसच्या धर्तीवर या बसची आकर्षक रचना करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेली प्रायोगिक चाचणी यशस्वी झाल्यास, PMPML लवकरच या बसेसची खरेदी प्रक्रिया सुरू करेल आणि पुणे-पिंपरी चिंचवडकरांना सार्वजनिक वाहतुकीचा एक मोठा आणि आधुनिक पर्याय उपलब्ध होईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com