जाहिरात

Pune News: पुण्यात खानावळीबाहेरील भन्नाट नोटीस व्हायरल; "जेवण महागण्यासाठी 'केशरी' केसांचा माणूस जबाबदार"

पुण्यातील एका हॉटेलने दरवाढीसाठी लावलेली नोटीस सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरवाढीचे समर्थन करण्यासाठी या हॉटेलने थेट जागतिक राजकारण आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मिश्किल शब्दांत निशाणा साधला आहे.

Pune News: पुण्यात खानावळीबाहेरील भन्नाट नोटीस व्हायरल; "जेवण महागण्यासाठी 'केशरी' केसांचा माणूस जबाबदार"

Pune News: पुण्यातील एका हॉटेलने दरवाढीसाठी लावलेली नोटीस सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरवाढीचे समर्थन करण्यासाठी या हॉटेलने थेट जागतिक राजकारण आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मिश्किल शब्दांत निशाणा साधला आहे. सायली महाशूर नावाच्या महिलेने 'X' (ट्विटर) वर शेअर केलेली ही नोटीस आता चर्चेचा विषय ठरली आहे.

नोटीसमध्ये काय लिहिले आहे?

या हॉटेलने अत्यंत धाडसी आणि उपरोधिक भाषेत आपली बाजू मांडली आहे."एका केशरी केसांच्या मूर्ख माणसाने अलीकडेच सुरू केलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी LPG गॅस आणि प्लास्टिक महागले आहे. त्यामुळे 21 मार्चपासून नवीन दर लागू होतील. कृपया सहकार्य करा किंवा युद्ध थांबवण्यास मदत करा." या नोटीसमधील 'केशरी केसांचा माणूस' हा संदर्भ थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जातो, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

(नक्की वाचा-  Ashok Kharat: नवऱ्याला बाहेर बसवून गर्भवती पत्नीला कॅबिनमध्ये बोलावलं अन्... अशोक खरातचं संतापजनक कृत्य)

सोशल मीडियावर उमटलेले पडसाद

सायली महाशूर यांच्या पोस्टनंतर इंटरनेटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. "किमान ते प्रामाणिक आहेत आणि दरवाढीचे कारण सर्जनशील पद्धतीने सांगत आहेत," अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. "हे विनोदी असले तरी दुःखद सत्य आहे, कारण जागतिक घडामोडींचा परिणाम स्थानिक व्यवसायांवर होतो," असे दुसऱ्याने म्हटले आहे.

(नक्की वाचा-  VIDEO: लोणावळ्यात जात असाल तर सावधान! पर्यटक कुटुंबासोबत भयंकर घडलं)

काहींच्या मते ही केवळ नोटीस नसून 'स्मार्ट मार्केटिंग' आहे, ज्यामुळे लोक केवळ ती नोटीस पाहण्यासाठी हॉटेलला भेट देतील. विनोदाचा भाग सोडला तर, लहान व्यवसायांना वाढत्या महागाईचा मोठा फटका बसत आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे वाहतूक खर्च आणि पॅकेजिंगचा खर्च वाढला आहे, ज्याचा परिणाम शेवटी ग्राहकांच्या खिशावर होत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com