Pune News: पुण्यातील एका हॉटेलने दरवाढीसाठी लावलेली नोटीस सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरवाढीचे समर्थन करण्यासाठी या हॉटेलने थेट जागतिक राजकारण आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मिश्किल शब्दांत निशाणा साधला आहे. सायली महाशूर नावाच्या महिलेने 'X' (ट्विटर) वर शेअर केलेली ही नोटीस आता चर्चेचा विषय ठरली आहे.
नोटीसमध्ये काय लिहिले आहे?
या हॉटेलने अत्यंत धाडसी आणि उपरोधिक भाषेत आपली बाजू मांडली आहे."एका केशरी केसांच्या मूर्ख माणसाने अलीकडेच सुरू केलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी LPG गॅस आणि प्लास्टिक महागले आहे. त्यामुळे 21 मार्चपासून नवीन दर लागू होतील. कृपया सहकार्य करा किंवा युद्ध थांबवण्यास मदत करा." या नोटीसमधील 'केशरी केसांचा माणूस' हा संदर्भ थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जातो, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.