जाहिरात

Pune News: पुणे मेट्रोची नवी गुगली! आता स्टेशनमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी बदलावी लागणार सवय

Pune Metro News: पुणे मेट्रोने प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Pune News: पुणे मेट्रोची नवी गुगली! आता स्टेशनमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी बदलावी लागणार सवय
Pune Metro Update : पुणे मेट्रोचे नवे नियम 3 मार्चपासून सुरु झाले आहेत.
पुणे:

Pune Metro News:  पुणे मेट्रोने प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आजपासून ( 3 मार्च 2026) मेट्रो स्टेशनवरील एएफसी (AFC) गेट्सच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. आता प्रवाशांना मेट्रो स्थानकात शिरताना किंवा बाहेर पडताना आपले तिकीट स्कॅन केल्याशिवाय गेट उघडणार नाही, ज्यामुळे गर्दीचे नियोजन अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे.

काय आहे नवा नियम?

पुणे मेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मेट्रो स्थानकांवरील ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन म्हणजेच एएफसी गेट्स हे नेहमी उघडे असायचे. एखादा प्रवासी तिकीट स्कॅन करायचा, तेव्हा हिरवा दिवा लागायचा आणि प्रवाशाला प्रवेश मिळत असे. जर एखाद्याने तिकीट स्कॅन केले नाही किंवा तिकीट अवैध असेल, तरच हे गेट्स बंद व्हायचे. 

मात्र, आता ही यंत्रणा पूर्णपणे बदलण्यात आली असून आता हे गेट्स डीफॉल्टनुसार बंदच राहतील. प्रवाशांनी आपले क्यूआर कोड तिकीट, मेट्रो कार्ड किंवा व्हॉट्सॲप तिकीट स्कॅन केल्यानंतरच हे गेट उघडले जाईल.

( नक्की वाचा : Pune News: पुणे मेट्रोचा धमाका! कॅम्प, पुलगेटमार्गे थेट उंड्री गाठता येणार, वाचा कुठून जाणार ट्रेन )
 

प्रवाशांच्या शिस्तीसाठी आणि सुरक्षेसाठी घेतलेला पुढाकार

या नवीन बदलामुळे मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग अधिक शिस्तबद्ध होतील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून यामुळे अधिकृत प्रवाशांना कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करता येईल. 

पुणे मेट्रोने त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून या बदलाची माहिती देताना स्पष्ट केले की, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी हा बदल 03/03/2026 पासून लागू करण्यात आला आहे. आता प्रवाशांना गेट उघडण्याची वाट पाहावी लागेल आणि स्कॅनिंग पूर्ण झाल्यावरच पुढे जाता येईल.

( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांनो सुटका झाली, हिंजवडी मेट्रो धावली! 23 किलोमीटर प्रवासातील सर्व स्टेशन्स कोणती? पहा VIDEO )

फेब्रुवारी महिन्यातील पुणे मेट्रोची विक्रमी कमाई

पुणे मेट्रोच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. फेब्रुवारी महिन्यात पुणे मेट्रोने तब्बल 8.22 कोटी रुपयांची कमाई केली असून या काळात एकूण 53.24 लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आहे. यामध्ये रामवाडी ते वनाज या कॉरिडॉरने सर्वाधिक 4.44 कोटी रुपयांचा महसूल मिळवला असून या मार्गावर 29.79 लाख प्रवाशांची नोंद झाली आहे.

दुसरीकडे, पिंपरी चिंचवड (PCMC) ते स्वारगेट या मार्गावरून 23.44 लाख प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून 3.77 कोटी रुपये जमा झाले आहेत. या वाढत्या प्रवासी संख्येला पाहता स्थानकांवरील शिस्त राखण्यासाठी नवीन गेट नियम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com