जाहिरात

पुणे महापालिकेचा दणका; 91 बांधकाम प्रकल्पांचे काम तातडीने थांबवण्याचे आदेश

Pune News : महाराष्ट्र महानगरपालिकेचे अधिनियम 1966 चे कलम 54 च्यानुसार नोटीस मिळाल्यानंतर तातडीने बांधकाम थांबले पाहिजे, असे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे महापालिकेचा दणका; 91 बांधकाम प्रकल्पांचे काम तातडीने थांबवण्याचे आदेश

रेवती हिंगवे, पुणे

पुण्यातील 91 बांधकाम प्रकल्पांचे काम थांबवण्याचे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत. बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी वारंवार सूचना देऊनही महापालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बांधकाम विभागाने झोन 1 ते 6 मध्ये विभागलेल्या झोनमध्ये सर्वाधिक नोटीस झोन 5 ला दिल्या होत्या. झोन 5 मधील एकूण 67 बांधकामांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या.  एका दिवसात शहरातील 158 बांधकाम प्रकल्पांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यातील 91 बांधकामांचे थेट कामच थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

(नक्की वाचा-  दोन उत्तपे कमी देणे पडले महागात; हॉटेल मालकाला ग्राहक आयोगाचा दणका)

महापालिकेच्या नोटीसमध्ये काय?

महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या नियमांची पूर्तता न केल्यास आणि काम सुरू ठेवल्यास पुणे महानगर पालिकेने आम्हाला करवाई करायचे अधिकार दिलेले आहे. महाराष्ट्र महानगरपालिकेचे अधिनियम 1966 चे कलम 54 च्यानुसार नोटीस मिळाल्यानंतर तातडीने बांधकाम थांबले पाहिजे, असे आदेश देण्यात आले आहेत. नोटीस मिळाल्यानंतरही काम चालू असल्यास पोलिसांच्या मार्फत करवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.  

(नक्की वाचा- खेळता खेळता खाली कोसळली, जीवानिशी गेली, 15 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत काय झालं?)

बांधकामाच्या ठिकाणी काय खबरदारी घ्यावी?

  • बांधकामाच्या ठिकाणी धुळ उडणार नाही याची काळजी सबंधितांने घेणे आवश्यक. 
  • बांधकाम सीमा भींतीला धूळ उडू नये म्हणून 25 फुटांचे पत्रे बांधणे आवश्यक 
  • बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी हिरवे कापड लाऊन झाकणे आणि त्यावर पाणी मारून धूळ उडणार नाही याची काळजी घेणे. 
  • रस्त्याच्या कडेला काम चालू असल्यास वर्दळीच्या वेळेत रस्त्यावर पाणी मारणे. 
  • राडारोडा वाहतूक करताना तो झाकून नेणे. 
  • राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांची टायर धुण्याची व्यवस्था असणे बंधनकारक. 
  • साइटवर काम करणाऱ्या मजुरांना आवश्यक ते सुरक्षा साहित्य देणे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com