रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Pune News: पुण्यातील राजकारण सध्या एका नवीन वळणावर येऊन ठेपले आहे. एकेकाळी कसब्याच्या पोटनिवडणुकीत ज्यांना भाजपने 'हू इज धंगेकर?' असे विचारले होते, आज त्याच रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांना आणि विशेषतः केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना घेरले आहे. दिवाळीच्या तोंडावर धंगेकरांनी मोहोळांवर दररोज आरोपांचा एक नवा 'बॉम्ब' टाकला आहे. अत्यंत गंभीर आणि थेट बिल्डर कनेक्शन असलेला शुक्रवारचा आरोप भाजपा नेत्यांच्या अडचणी वाढवणारा आहे. धंगेकरांनी मोहोळ महापौर असताना कथितरित्या एका बिल्डरची पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) कार वापरत होते, असा थेट आरोप केला आहे.
धंगेकरांचा नेमका आरोप काय?
मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर असताना MH 12 SW 0909 या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) कार वापरत होते. ही कार मोहोळ यांच्या किंवा पुणे महानगरपालिकेच्या मालकीची नव्हती. ही कार कोथरूडमधील बढेकर बिल्डर यांची होती, असा आरोप धंगेकर यांनी केला आहे.
धंगेकरांच्या आरोपानुसार, हे तेच बढेकर बिल्डर आहेत, ज्यांनी जैन होस्टेल खरेदी करण्यासाठी 'दोन नंबरचा लिलाव' लावला होता आणि ते मुरलीधर मोहोळ यांचे 'पार्टनर' आहेत.
महापौरपदाचा गैरवापर करून बिल्डरला फायदा?
बिल्डरची कार वापरत असताना महापौरपदाचा गैरवापर करून संबंधित बिल्डरला अनेक प्रकल्प मंजूर करून देण्यात आले का, असा प्रश्न धंगेकर यांनी उपस्थित केला आहे.
रवींद्र धंगेकर यांनी फेसबुक पोस्टद्वारे केलेल्या आरोपांनुसार,
पर्यावरण आणि बिल्डर कनेक्शन
मुरलीधर मोहोळांनी हजारो पर्यावरणवाद्यांचा विरोध पत्करून वेताळ टेकडी टनेल (Vetal Tekdi Tunnel), एचसीएमटीआर (HCMTR) रस्ता आणि बालभारती ते पौड फाटा लिंक रोड (Balbharti to Paud Phata Link Road) हे प्रकल्प आणण्याचे प्रयत्न चालवले.
पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी हे प्रकल्प आणले जात आहेत, असे वरवर वाटत असले तरी, त्यामागे वेगळे कारण असल्याचा आरोप होत आहे. गोखले, बढेकर (Badhekar) आणि आणखी तीन बिल्डर्सच्या जमिनी या भागात आहेत. वेताळ टेकडी परिसरात या बिल्डर्सना मोठे प्रकल्प करता यावेत, यासाठीच हा 'घाट' घालण्यात आला असा आरोप होत आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुण्याच्या मॉर्डन कॉलेजमुळे मराठी तरुणानं लंडनमधील नोकरी गमावली? प्राचार्यांनी दिलं उत्तर )
धंगेकरांनी दावा केला आहे की, या बिल्डरचे मागील 5 वर्षांचे बॅलन्सशीट (Balance Sheet) तपासल्यास लक्षात येईल की त्यांनी किती कोटींच्या कोटी उड्डाणे सहज गाठली आहेत. महापौरपद आणि केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत या कंपनीद्वारे मनी लॉन्ड्रींगचा (Money Laundering) प्रकार झाल्याचे दिसून येईल, ज्यामुळेच माननीयांची संपत्ती तब्बल 400 पटीने वाढली आहे.
मोहोळ आणि भाजप नेत्यांकडून आरोपांचा इन्कार
रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या या सर्व आरोपांचा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मात्र इन्कार केला आहे. भाजपचे अन्य नेतेही मोहोळ यांच्या मदतीला धावून आले आहेत. "हे व्यक्तिगत द्वेष आणि आकसातून बोलले जात आहे. हा एक बोगस कार्यक्रम चालला आहे. त्यांनी कागद दाखवावे आणि मग बातमी करावी, '' असं उत्तर मुरलीधर मोहोळ यांनी दिलं आहे.
"हे पिसाळलेले लोक आहेत, त्यांना त्यांचे स्थानिक राजकारण करायचे आहे. मोहोळ यांच्यावर बोलल्याशिवाय त्यांना आपले राजकारण जिवंत ठेवता येत नाही. त्यांनी मोहोळांना विरोधक मानले आहे, त्यांची स्थानिक लढाई तयार झाली आहे, '' असा पलटवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.
राजकीय परिणाम आणि महायुतीत तणाव
मुरलीधर मोहोळ यांचे पुणे आणि दिल्लीतील राजकारणातील वाढते स्थान पाहता, त्यांच्यावर सातत्याने होणारे हे गंभीर आरोप भाजपसाठी निश्चितच अडचणीचे ठरू शकतात. विशेषतः आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर एका बड्या नेत्यावर अशाप्रकारचे आरोप होणे भाजपला परवडणारे नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे आरोप मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्याकडून होत असल्याने पुण्यात महायुतीमधील (MahaYuti) वातावरणही बिघडू लागले आहे. आता या प्रकरणाची दखल भाजप आणि शिवसेनेचे (Shiv Sena - Shinde Group) राज्याचे नेतृत्व कधी आणि कशी घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- बिल्डरची कार वापरल्यामुळे महापौरपदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होईल असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले?
- विशेषतः कोथरूड (Kothrud) भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प (Society Redevelopment Projects) बढेकर बिल्डरला देण्यात आलेले आहेत.
- या आरोपांमधून धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांच्या नीतिमत्तेवर थेट प्रश्न उपस्थित केला आहे.
- रवींद्र धंगेकर यांचे आणखी काही गंभीर आरोप
- "बढेकर बिल्डर मुरलीधर मोहोळांचे पार्टनर असून जैन होस्टेलच्या लिलावात सहभागी होते. मोहोळ यांच्या काळातच कामांचे टेंडर 1 ऐवजी 5 ते 20 वर्षांसाठी देण्यात आले." धंगेकर फक्त बिल्डरच्या गाडीच्या आरोपावर थांबले नाहीत, तर त्यांनी मोहोळांची संपत्ती तब्बल 400 पटींनी (Four Hundred Times) वाढल्याचा अत्यंत खळबळजनक दावाही केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world