- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॉडीगार्ड दिलीप जाधव यांचंही निधन
- विदीप जाधव मूळचे ठाण्यातील विटावा परिसरातील रहिवासी
- अपघाताची सखोल चौकशी करण्याची शेजाऱ्यांची मागणी
Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्रातील बारामती येथे बुधवारी (28 जानेवारी 2026) झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. अजित पवार यांच्यासोबत त्या खासगी जेटमध्ये प्रवास करणाऱ्या पाचही जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचाही समावेश आहे. या भीषण दुर्घटनेत विदीप जाधव यांचा मृत्यू झाल्यानंतर NDTVची टीम त्यांच्या घरी पोहोचली. जेथे ते भाडेतत्त्वावरील घरात राहत होते, त्या घराला कुलूप असलेले आढळले. परिसरातील नागरिकांनी विदीप जाधव यांच्याबद्दल माहिती दिली. शेजाऱ्यांनी सांगितले की, विदीप जाधव गेल्या अनेक वर्षांपासून विटावा येथील 'श्रीकृष्ण विहार'मध्ये राहत होते. त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांनी NDTVशी बोलताना सांगितले की, विदीप अत्यंत भले माणूस होते. आपल्या कामाशी काम ठेवायचे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता.
अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला.
विदीप जाधव यांच्या कुटुंबात कोणकोण आहे?
शेजारी राहणाऱ्या श्रुती वालकर यांनी सांगितले की, विदीप यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा- एक मुलगी असे सदस्य आहेत. पुढे त्या म्हणाल्या की, सकाळी ड्युटीवर जाताना आम्ही विदीप यांना पाहिले होते. ते बाईकवरुन जात होते. दोन-तीन तासांनंतर अपघाताची बातमी समजली, ज्यामध्ये दादा (अजित पवार) यांचा मृत्यू झाल्याचे कळले आणि विदीपही आता आपल्यात नाहीत. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
अजित पवार यांचा अंगरक्षक विदीप जाधव यांच्या घराला कुलूप
सावलीप्रमाणे अजित पवार यांच्यासोबत असायचे विदीप जाधव
विदीप दिलीप जाधव हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निष्ठावान आणि सतर्क PSO होते. ते वर्ष 2009 पासून मुंबई पोलीस दलात कार्यरत होते आणि अनेक वर्षे अजित पवार यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहून त्यांची सुरक्षा करत होते. दुर्दैवाने बारामती येथे झालेल्या विमान अपघातात विदीप जाधव यांचे निधन झाले.
(नक्की वाचा: Ajit Pawar Plane Crash: जानेवारीत विमान दुर्घटना, राजकीय प्रमुख व्यक्तीच्या मृत्यूची शक्यता, ज्योतिषींनी वर्तवलं होतं भाकित)
ठाण्यातील विटावा परिसरातील रहिवासी होते अजित पवार यांचे PSOमिळालेल्या माहितीनुसार विदीप जाधव वर्ष 2009 पासून मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. अजित पवार यांचे विश्वासू अंगरक्षक (PSO) म्हणून त्यांची ओळख होती. ते अत्यंत शिस्तबद्ध आणि सतर्क पोलीस कर्मचारी होते. विदीप मूळचे ठाणे जिल्ह्यातील विटावा परिसरातील रहिवासी होते. अजित पवार यांच्या दौऱ्यांदरम्यान आणि सभांमध्ये त्यांच्या सुरक्षेत विदीप यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असायची.
(नक्की वाचा: Ajit Pawar Death: 8:10 वाजता टेक ऑफ, 8:46 वाजता अपघात: अजित पवारांच्या विमानमार्गात नेमकी काय झाली गडबड?)
विदीप जाधव यांचे शेजारी सुशांत सूर्यराव, ऋषिकेश आणि इतरांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांनी योग्य मोबदला देण्यात यावा तसेच प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली.