- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान बारामतीजवळील डोंगराळ भागात अपघातात निधन झाले
- विमानाने सकाळी 8.43 वाजता सिग्नल पाठवणे बंद केले आणि 3 मिनिटांत अपघात झाला
- विमान मुंबई विमानतळावरून रवाना होऊन बारामती विमानतळापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर कोसळले
Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (28 जानेवारी 2026) सकाळी त्यांच्या मूळ गावी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले. विमानाने सकाळी 8 वाजून 43 मिनिटांनी सिग्नल पूर्णपणे पाठवणे बंद केले होते, अशी माहिती समोर आलीय. अखेर असे नेमरे का घडले? असा प्रश्न उपस्थित होतोय. अजित पवार यांच्या विमान अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. विमान जमिनीवर आदळताच किती मोठा स्फोट झाला, हे या व्हिडीओमध्ये दिसतंय. विमानाचा बुधवारी सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी अपघात झाला. फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार, हे व्यावसायिक विमान मुंबई विमानतळावरून सकाळी सुमारे 8:10 वाजता रवाना झाले होते. सुमारे 36 मिनिटांनंतर हे विमान बारामतीजवळील एका डोंगराळ भागात कोसळले.
विमानाने सकाळी 8:43 वाजता सिग्नल पाठवणं केलं बंद
लेअरजेट 45 (Learjet 45) या विमानाची आठ ते नऊ प्रवाशांना नेण्याची क्षमता होती. या लेअरजेट 45 विमानाकडून सकाळी 8 वाजून 34 मिनिटांनी Surveillance Signals पाठवणे बंद झाले होते, पण काही मिनिटांनंतर घिरट्या मारत विमानाकडून पुन्हा सिग्नल पाठवणे सुरू झाले. फ्लाइटरडार 24 नुसार, सुमारे 8:43 वाजता सिग्नल पूर्णपणे बंद झाले, ज्याद्वारे अपघाताची संभाव्य वेळ स्पष्ट होते.
विमानाचा वेग 237 किमी प्रतितास होता...
विमानाकडून सिग्नल येणे बंद झाल्यानंतर केवळ तीन मिनिटांत अपघात झाला. ज्या ठिकाणी विमानाने एडीएस-बी सिग्नल पाठवणे बंद केलं, तेथून बारामती विमानतळापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर होते, याच ठिकाणी विमान उतरणार होते. पण विमान त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकले नाही. एडीएस-बी एक्सचेंज या फ्लाइट ट्रॅकिंग सेवेवरून मिळालेल्या माहितीनुसार, विमान 1016 मीटर (एक किलोमीटरपेक्षा अधिक) उंचीवरून 237 किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण करत होते, त्याच वेळी विमानाचा सिग्नल ट्रॅकर्सशी संपर्क तुटला.

एडीएस-बी डेटाच्या प्राथमिक माहितीनुसार, विमानाच्या उड्डाण मार्गामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता. उड्डाणाच्या दहा मिनिटांनंतर विमान 6 किलोमीटरपेक्षा अधिक उंचीवर होते आणि 1036 किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण करत होते. पण अचानक विमानाला नेमके काय झाले, हा तपासाचा विषय आहे. हे विमान साहिल मदान चालवत होते, ज्यांना 16 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता. हे विमान VSR Ventures Pvt Ltd या खासगी विमानसेवा कंपनीचे होते. ही कंपनी भाड्याने विमान देण्यासोबतच एव्हिएशन कन्सल्टन्सीचेही काम करते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world