जाहिरात

Pune Water Crisis: धरणे फुल, तरीही पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट? काय आहे कारण?

Pune News : पुणे महापालिकेने जलसंपदा विभागाकडे 21.3 टीएमसी अतिरिक्त पाणी कोटा मिळावा अशी मागणी केली होती. मात्र, ही मागणी जलसंपदा विभागाने फेटाळली आहे.

Pune Water Crisis: धरणे फुल, तरीही पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट? काय आहे कारण?

रेवती हिंगवे, पुणे

Pune News : पुणे शहराची हद्द आणि लोकसंख्या वाढल्याने पुणेकरांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी पुणे महापालिकेने जलसंपदा विभागाकडे अधिक पाणी मिळावे अशी मागणी केली होती. मात्र जलसंपदा विभागाने ही मागणी फेटाळल्याने पुणेकरांना पाणीकपातीची सामना करावा लागू शकतो.

पुणे महापालिकेने जलसंपदा विभागाकडे 21.3 टीएमसी अतिरिक्त पाणी कोटा मिळावा अशी मागणी केली होती. मात्र, ही मागणी जलसंपदा विभागाने फेटाळली आहे. विभागाने पूर्वीप्रमाणेच 14.61 टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे, ज्यामुळे शहरातील पाण्याच्या संकटात वाढ होण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा- Pune Crime : विद्यार्थ्यांमध्ये वाद, पुणे जिल्ह्यातील न्यू इंग्लिश शाळेत गोळीबार; धक्कादायक प्रकार)

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहराच्या हद्दीचा विस्तारही झाला आहे. त्यामुळे पालिकेला वाढीव पाणीपुरवठा करण्याची गरज भासत आहे. याच गरजेनुसार, दरवर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये पालिकेने वाढीव पाण्याची मागणी केली होती.

नक्की वाचा - Beed Crime News:कला केंद्र, नाच, iphone, पैसा अन्..बीडच्या विवाहित माजी उपसरपंचाची 'ती' च्या घरासमोर आत्महत्या

2031 पर्यंत जुनाच पाणी कोटा मंजूर

महापालिकेने केलेल्या मागणीनुसार, 21.3 टीएमसी पाणी मिळाल्यास भविष्यातील गरजा पूर्ण करणे शक्य होणार होते. मात्र, जलसंपदा विभागाने हा वाढीव पाणी कोटा मंजूर केलेला नाही. त्यांनी 2031 पर्यंत शहरासाठी फक्त 14.61 टीएमसी पाणी कोटाच मंजूर केला आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. वाढती लोकसंख्या आणि मर्यादित पाणी यामुळे पालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com