
रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Pune News : पुण्यातील सरकारी कार्यालयाचं एक धक्कादायक कृत्य समोर आलं आहे. पुण्यातील काही शासकीय कार्यालयांमुळे महानगरपालिकेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मनपाच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत आहे. पुण्यातील सरकारी कार्यालयांनी पुणे महापालिकेची कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महानगरपालिका हद्दीतील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यालयांनी महापालिकेची तब्बल 342 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकवली आहे.
सामान्य नागरिकांकडून वेळेत कर वसूल करणारी पुणे महानगरपालिका सरकारी कार्यालयांना अभय देत असल्याची चर्चा केली जात आहे. यामध्ये पाणीपट्टीची सर्वाधिक 50 कोटींची थकबाकी गॅरीसन इंजिनियर्स यांच्याकडे आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डावर 40 कोटी, रेल्वे प्रशासनावर 45 कोटी, ससून रुग्णालय 8 कोटी, येरवडा कारागृह 7 कोटी याशिवाय केंद्र सरकारचे टपाल, बीएसएनएल, जलसंपदा विभाग, पोलिस विभाग, शिक्षण खाते यांच्याकडे देखील लाखो रुपयांची थकबाकी प्रलंबित असल्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाची कबुली दिली आहे.
नक्की वाचा - New Rule for Maharashtra Govt Employees: 'ओळख' लपवणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना दणका, नियम मोडल्यास मोठी कारवाई होणार
कोणाकडे नक्की किती थकबाकी?
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड : सुमारे 40 कोटी
गॅरीसन इंजिनियर्स : सुमारे 50 कोटी
रेल्वे प्रशासन : जवळपास 45 कोटी
ससून रुग्णालय : 8 कोटी
येरवडा कारागृह : 7 कोटी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world