नवीन वर्ष म्हणजेच 2026 साल उजाडण्यास आता अवघे काही तास उरले आहेत. 31 डिसेंबर 2025 रोजी बुधवार येत असून अनेकांनी पार्टीचे जंगी प्लॅन बनवले आहेत. (New Year Celebration Party) या दिवशी बरेच जण आपल्या कुटुंबासोबत किंवा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करणं पसंत करतात. गेल्या काही वर्षात नवीन वर्षाचे सेलिब्रेशन संपूर्ण कुटुंबासोबत करता यावं यासाठी 3-4 दिवसांची सुट्टी घेऊन पर्यटनस्थळी जाण्याला अनेकजण पसंती देतात. मात्र काही मंडळी अशीही आहेत जी पार्टी करण्याऐवजी देवाचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरूवात करणे पसंत करतात. यामुळेच शिर्डीच्या साईबाबा मंदिरात, सिद्धीविनायक मंदिरात, कोल्हापूरची अंबाबाई मंदिरात किंवा तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात 31 डिसेंबर रोजी मोठी गर्दी उसळत असल्याचे पाहायला मिळते. ज्योतिषांनी पार्टीऐवजी 31 डिसेंबरच्या रात्री घरात दोन साधे सोपे उपाय केल्यास वर्षभर धनवर्षाव होईल असं सांगितलं आहे. कोणते आहेत हे उपाय, ते कसे करायचे पाहूयात.
नक्की वाचा: श्रीहरींच्या आशीर्वादाने सुख नांदो घरात, पुत्रदा एकादशी 2025 खास शुभेच्छा संदेश
तमालपत्र, हिरव्या शाईचे पेन आणि अत्तराचा उपाय
ज्योतिषी भावना उपाध्याय (Bhavna Upadhyay Youtube Video) यांचे व्हिडीओ युट्युबला बरेच पाहिले जातात. भावना यांनी लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हावी, कुबेराप्रमाणे घरात श्रीमंती नांदावी यासाठी दोन उपाय सुचवले आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता हे उपाय केल्यास त्याचा निश्चित फायदा होईल असा त्यांनी दावा केला आहे. यातला पहिला उपाय आहे तो तमालपत्राचा. भावना उपाध्याय यांनी म्हटले आहे की, एक हिरव्या शाईचे पेन, अत्तर आणि एक तमालपत्र घ्यावे. तमालपत्रावर इन्फिनिटी (Infinity Sign) काढून पुढे आपली इच्छा लिहावी. यानंतर तमालपत्राला अत्तर लावावे आणि डोळे बंद करून तुम्ही जी इच्छा लिहिली आहे ती पूर्ण झाली आहे अशी कल्पना कराली. उदा. जर तुम्ही आपले घर व्हावे अशी इच्छा लिहिली असेल तर डोळ्यासमोर आपण आपल्या स्वप्नातील घरामध्ये आहोत आणि संपूर्ण घर फिरत आहोत असे चित्र डोळ्यासमोर आणावे. आपली इच्छा तीनवेळा मनात बोलावी आणि नंतर ते तमालपत्र जाळून टाकावे. तमालपत्र जाळल्यानंतर त्याची राख ही झाडांना घालावी असं भावना उपाध्याय यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा: मकर संक्रांती ते मौनी अमावस्या; वाचा नववर्षातील पहिल्या महिन्यातील सर्व सण आणि उत्सव
तमालपत्राच्या उपायाबद्दलचा भावना उपाध्याय यांच्या व्हिडीओ पाहा
लसणाच्या सालीचा उपाय
भावना उपाध्याय यांनी सांगितलेला दुसरा उपाय हा देखील सोपा आहे. त्यांनी म्हटलंय की, लसूण सोलल्यानंतर त्याची जी सालं जमा होतात ती साठवून ठेवा. ही सालं मातीच्या पणतीमध्ये ठेवा आणि घराच्या कानाकोपऱ्यामधून पणती फिरवा, फिरवत असताना घरातील निगेटीव्ह एनर्जी निघून जावी, अरिष्ट टळावीत, कोणाची नजर लागली असेल ती दूर व्हावी, वाईट गोष्टींचा होणारा त्रास दूर व्हावा अशी मनोमन प्रार्थना कराली. यानंतर ती सालं एक-दोन कापूर वडी घालून पेटवावीत. सालं पेटवत असताना घराच्या मुख्य दरवाजाकडे तोंड करून ती जाळावीत. यानंतर ती पणती दारापाशी ठेवून द्यावी असे भावना उपाध्याय यांनी म्हटले आहे.
लसणाच्या सालीच्या उपायाबद्दलचा भावना उपाध्याय यांच्या व्हिडीओ पाहा
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world