Pune News: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी आणि वादाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हडपसर परिसरातील अत्यंत गजबजलेल्या 15 नंबर चौकात आज रिकव्हरी एजंट आणि एका ग्राहकामध्ये भरदिवसा जोरदार राडा झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.
भररस्त्यात लाथाबुक्क्यांचा वर्षाव
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बँक एजंट हा एका ग्राहकाकडे क्रेडिट कार्डची थकबाकी मागण्यासाठी आला होता. 15 नंबर चौकात दोघांची भेट झाली असता, सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. वसुलीच्या भाषेवरून आणि पद्धतीवरून हा वाद विकोपाला गेला. काही क्षणांतच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोघांनीही एकमेकांवर लाथाबुक्क्यांचा वर्षाव केला. भररस्त्यात सुरू असलेला हा प्रकार पाहून वाहनचालक आणि पादचारी थबकले.
Shock in Pune's Hadapsar 15 No. Chowk: Private finance recovery agents brutally beat a man on the street in front of his wife over credit card dues. pic.twitter.com/QnV0wrYkKJ
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 27, 2026
रिकव्हरी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे बँकांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या खासगी वसुली एजंट्सच्या वर्तणुकीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, वसुलीसाठी कोणत्याही ग्राहकाला धमकावणे किंवा सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे बेकायदेशीर आहे. अनेकदा एजंट्सकडून वसुलीसाठी दबावाचे आणि हिंसेचे तंत्र वापरले जाते, ज्याचे पडसाद आज हडपसरमध्ये पाहायला मिळाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या दोन्ही पक्षांची चौकशी सुरू असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world