जाहिरात

Pune News: पुणेकरांच्या भीतीत वाढ, आता पुणे एअरपोर्ट परिसरात शिरकाव! कडेकोट सुरक्षेसह स्थानिकांसाठी अलर्ट जारी

Pune Leopard Terror News: पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या भीतीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चाललीय. आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय.

Pune News: पुणेकरांच्या भीतीत वाढ, आता पुणे एअरपोर्ट परिसरात शिरकाव! कडेकोट सुरक्षेसह स्थानिकांसाठी अलर्ट जारी
"Pune Leopard Terror News: पुणेकरांच्या भीतीमध्ये वाढ..."
Canva
  • राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बिबट्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
  • पुणे विमानतळ परिसरात एका आठवड्यात दोन वेळा बिबट्या दिसल्याने खळबळ
  • पुणेतील कौलीमळा परिसरात तीन बिबटे आढळल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Pune Leopard Terror News: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या बिबट्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. काही ठिकाणी स्थानिक गळ्याभोवती चामड्याचे काटेरी पट्टे बांधत आहे, तर काही ठिकाणी शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत, तर काहींनी घराच्या अवतीभोवती पिंजऱ्यासारखे कुंपण घालून घेतली आहेत. बिबट्यांमुळे पुणे जिल्ह्यातही लोकांमध्ये भीती निर्माण झालीय.

पुणे विमानतळ अधिकाऱ्यांनी उचचलं मोठं पाऊल

पुणे विमानतळ परिसरात याच आठवड्याच्या सुरुवातीला एकाच दिवशी दोनदा बिबट्या दिसला, ज्यानंतर या परिसरात सुरक्षाव्यवस्थेसह देखरेख वाढवण्यात आलीय, अशी माहिती अधिकाऱ्यांनी (22 नोव्हेंबर) शनिवारी दिलीय. विमानतळ अधिकाऱ्यांनी वन विभागाला कळवलंय की 19 नोव्हेंबर रोजी बिबट्या पहिल्यांदा पहाटे 5.30 वाजता आणि त्यानंतर संध्याकाळी 7.40 वाजता दिसला. यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आलाय, तर त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरेही बसवण्यात आले आहेत, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.

यापूर्वी पुण्यातील कौलीमळा परिसरात एकाच वेळी तीन बिबटे आढळले होते. परिसरातील एका नागरिकाच्या घरासमोर पहाटे 3 वाजता बिबटे फिरत असल्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. बिबट्यांमुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झालंय. 

(नक्की वाचा: Leopard attack: 'त्या' बिबट्यांची नसबंदी करणार! ड्रोनने शोधून पकडणार; वाचा राज्य सरकारचे ऐतिहासिक निर्णय)

पुणे जिल्ह्यात दोन बचाव केंद्रे सुरू करा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुसरीकडे मानवांवर हल्ले करणाऱ्या बिबट्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ठिकाणी तातडीने पिंजरे बसवावेत. यासोबतच पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी दोन रेस्क्यू सेंटर पुढील दोन ते तीन महिन्यांत सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिले.

(नक्की वाचा: Nagpur News: बिबट्यावर चिमुकल्याने थेट चप्पल फेकून मारली, त्यानंतर पुढील 4 तास अंगावर काटा आणणारा थरार)

मुख्यमंत्री फडणवीस असंही म्हणाले होते की, राज्यात बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी कालबद्ध पद्धतीने तातडीचे आणि दीर्घकालीन अशा दोन प्रकारे उपाययोजना करण्यात याव्यात. तातडीच्या उपायांमध्ये गावं तसेच शहरांजवळील बिबट्यांना शोधून पकडण्यात यावेत. यासाठी ड्रोनची मदत घ्यावी. पिंजरे, वाहने, मनुष्यबळ आदी बिबटे पकडण्यासाठी आवश्यक साहित्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून द्यावेत. तसेच दीर्घकालीन उपाययोजनेत बिबट्यांची नसबंदी करण्यात यावी. तसेच पकडलेल्या नरभक्षक बिबट्यांना ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यात दोन रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी तातडीने जागा शोधून आराखडे तयार करावेत. तसेच गोरेवाडा सह इतर ठिकाणी सध्या असलेल्या रेस्क्यू सेंटरची क्षमता वाढवण्यात यावी.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com