जाहिरात

Pune News: बेरोजगारीला कंटाळून 40 वर्षीय व्यक्तीने हाती घेतली बंदूक अन् पुढे जे काही केलं ते...

त्यावेळी त्याला घरातल्यांनी हटकले. पण काही कळायच्या आत सांगबोईने बॅगेतून बंदूक काढली. त्याने गगन यांच्या कपाळाला ती लावली.

Pune News: बेरोजगारीला कंटाळून 40 वर्षीय व्यक्तीने हाती घेतली बंदूक अन् पुढे जे काही केलं ते...
पुणे:

सूरज कसबे 

बेरोजगारीला कंटाळून पिंपरी चिंचवड शहरातील एका 40 वर्षीय व्यक्तीने चुकीचा मार्ग अवलंबला आहे. त्याने थेट हातात बंदूक घेत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पिंपळे गुरवमध्ये घडली आहे. एक वर्षांपासून हा तरुण बेरोजगार होता. तो मुळचा  मणिपूर इथला रहिवाशी आहे. सांगबोई कोम सेरटो असं याचं नाव आहे. त्याने उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या कल्पतरू इस्टेट फेज तीनमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत प्रतिकार करणारे दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. गगन सीताराम बडेजा यांनी याबाबत सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे. त्याच्या चौकशीत तो चोरी का करत होता हे त्याने सांगितले आहे.  

31 जुलै रोजी रात्री सातच्या दरम्यान गगन बडेजा यांच्या घराची डोअर बेल वाजवली गेली. तेव्हा घरातील महिलेने दरवाजा उघडला. पण बाहेर कुणीच दिसलं नाही. काही मिनिटांनी पुन्हा दरवाजाची डोअरबेल वाजली. गगन यांनी दरवाजा उघडला तेव्हा चोरटा सांगबोई समोर उभा होता. यावर चोराटा सांगभोई याने सीताराम बडेजा यांचं पार्सल आलं आहे असं त्याने सांगितलं. शिवाय त्याने आयडी कार्डही मागितलं. त्यावेळ ते आयकार्ड आणण्यासाठी घरामध्ये गेले. त्याच वेळी तो चोरटा घरात  शिरला असं तक्रारदाराने सांगितले.

नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप

त्यावेळी त्याला घरातल्यांनी हटकले. पण काही कळायच्या आत सांगबोईने बॅगेतून बंदूक काढली. त्याने गगन यांच्या कपाळाला ती लावली. घरातील मौल्यवान वस्तू आणि दागिने आणण्यास सांगितले. हॉलमध्ये काहीतरी सुरू आहे, म्हणून घराच्या दुसऱ्या खोलीमध्ये असलेला गगन यांचा भाऊ बाहेर आला. तेव्हा सांगबोईने बंदुक त्याच्या दिशेने नेली. यात ते दोघे भाऊ घाबरले होते. त्यानंतर तिघांमध्ये जोरदार झटापट झाली. दोन्ही भावांनी त्याचा प्रतिकार केला. तेवढ्यात सांगबोईने कंबरेला असलेली कुकरी काढली. त्याने दोन्ही भावांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

नक्की वाचा - Mumbai News: श्रीमंत महापालिकेची शाळा 1 महिन्यापासून बंद, 2 हजार विद्यार्थी वाऱ्यावर

त्यात पुन्हा त्यांच्यात झटापट झाली. अखेर त्याला खाली पाडले. त्याचे हात पाय बांधले. मग सांगवी पोलिसांना बोलवून घेतले . पोलिसांनी दोन्ही भावांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. दरम्यान, मणिपूर येथील रहिवासी असलेला सांगबोई कोम हा सध्या पुण्यातील कोंढवा येथे राहत होता. त्याने पाळत ठेवून चोरीचा प्लॅन केला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बेरोजगरीतून हे पाऊल उचल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सांगबोई हा मणिपूर येथील आहे. त्याच्यावर याआधी कुठलाही गुन्हा दाखल नाही, असं पोलिसांनी सांगितलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com