जाहिरात

Pune News: पुण्यात काही ठिकाणी वाहतूक मार्गात बदल, 'या' कारणासाठी केले बदल

हे आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे उपआयुक्त हिंमत जाधव यांनी जारी केले आहेत.

Pune News: पुण्यात काही ठिकाणी वाहतूक मार्गात बदल, 'या' कारणासाठी केले बदल
पुणे:

पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही बाब आता पुणेकरांसाठी काही नवी राहीलेली नाही. पण जर का पुण्यात कोणी व्हीआयपी येणार असेल तर पुण्यातील वाहतूक मार्गात बदल केले जातत. तसेच बदल उद्या म्हणजे 4 जुलैला काही मार्गामध्ये करण्यात आले आहे. हे बदल अति महत्वाच्या वक्तींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुणेकरांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता ही निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बंडगार्डन, काळेपडळ, कोंढवा व भारती विद्यापीठ वाहतूक विभागांतर्गत 4 जुलै 2025 रोजी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आले आहेत. तसे निर्देश ही स्थानिक प्रशासनाने जारी केले आहेत. पुण्यात जे काही तात्पूरत्या स्वरूपात वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Pune News: पुण्यात मुंबईप्रमाणे लोकलसेवा सुरू होणार? विधानसभेत सरकारचं उत्तर काय?

बंडगार्डन वाहतुक विभागाअंतर्गत मोर ओढा ते सर्किट हाऊस चौक ते आय.बी. चौक दरम्यानची एकेरी वाहतूक आवश्यकतेनुसार दुतर्फा वाहतुक करण्यात येत आहे.  तसेच काळेपडळ,  कोंढवा व भारती विद्यापीठ वाहतूक विभागांतर्गत 4 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मंतरवाडी फाटा ते खडी मशिन चौक ते कात्रज चौक दरम्यानच्या रस्त्यावरील सर्व माल वाहतूक करणारी वाहने, डंपर, मिक्सर, ट्रक, जड, अवजड व धीम्या गतीने चालणाऱ्या (स्लो मुव्हिंग) वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे. असे आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे उपआयुक्त हिंमत जाधव यांनी जारी केले आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com