जाहिरात

Pune News: पुण्यात 'या' भागात गुरूवारी पाणी पुरवठा राहणार बंद

पुण्यात त्यामुळे एक दिवसासाठी पाणी पुरवठा बंद राहील. त्यामुळे पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune News: पुण्यात 'या' भागात गुरूवारी पाणी पुरवठा राहणार बंद
पुणे:

ऐन पावसाळ्यात पुणेकरांना पाणी साठवून ठेवावं लागणार आहे. त्याचं कारण ही तसचं आहे. पुण्यातील काही भागात गुरूवारी 17 जुलैला पाणी पुरवठा हा बंद राहाणार आहे. त्यामुळे बुधवारीच पुणेकरांनी घरात पाणी साठवून ठेवावे असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे. शुक्रवार 18 जुलैला सकाळी उशीरा कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाईल असं ही महापालिकेने स्पष्ट केलं आहे. याबाबतचं प्रसिद्धी पत्रक पुणे महापालिकेच्यावतीने जाहीर करण्यात आलं आहे.   

गुरूवारी 17 जुलैला पर्वती रॉ वॉटर येथील मुख्य Prestress Line ची गळती रोखण्यासाठी  जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि त्या अंतर्गत पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर व पर्वती LLR टाकी परिसर, पर्वती टँकर पॉईंट तसेच एस. एन. डी.टी पपिंग अंतर्गत फ्लोमीटर बसविणेचे काम करण्यात येणार आहे. त्याच बरोबर देखभाल दुरुस्ती विषयक ही काम केले जाणार आहे. 

नक्की वाचा - Pandharpur News: दिरासोबत प्रेमसंबंध, मृत्यूचा बनाव अन् हत्या; सिनेमालाही लाजवेल अशा घटनेने सगळेच हादरले

त्यामुळे वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, GSR टाकी परिसर, एस. एन. डी. टी. (एच. एल. आर.), एस. एन. डी. डी. (एम. एल. आर.), चतुःश्रृंगी टाकी परीसर, पाषाण पंपिंग व सुस गोल टाकी परिसर, जुने वारजे जलकेंद्र भाग येथील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरूवारी पुण्यातील या भागात पाणी पुरवठा बंद राहाणार आहे. 

नक्की वाचा - Sangli News: सांगलीचा रँचो! 10 वीच्या विद्यार्थ्याचा देसी जुगाड, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना चाप बसणार

पुण्यात त्यामुळे एक दिवसासाठी पाणी पुरवठा बंद राहील. अशा स्थितीत ज्या ठिकाणी पाणी येणार नाही त्या नागरिकांनी आजच पाण्याचे नियोजन करावे असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे. अनेक सोसायट्यांनाही याबाबत नियोजन करावे लागणार आहे. जेणेकरून पाण्याची टंचाई निर्माण होवू नये. या काळात पाण्याच्या टँकरची मागणी वाढण्याची शक्यता ही या पाणी बंद मुळे होवू शकते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com