
देवा राखुंडे, दौंड
Pune Crime news : नवऱ्यांना पत्नीला मित्रांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील दौंट तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी ही घटना घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी नवऱ्यासह चौघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरतगाव येथील एका विवाहित महिलेला तिचा पती स्वतःच्या तीन मित्रांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. मागील दोन वर्षांपासून हा सगळा प्रकार सुरु होता. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, 2023 पासून एप्रिल 2025 पर्यंत सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ सहन करत होती.
(नक्की वाचा- Dharashiv News: छेडछाडीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीची आत्महत्या)
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या इच्छेविरुद्ध शेतात आणि घरी तिच्या पतीने त्याच्या मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी पत्नीवर दबाव टाकला. पीडितेने अखेर यवत पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले.
(नक्की वाचा- शादी डॉटकॉमवर ओळख, CEO असल्याची बतावणी अन्... उच्चशिक्षित तरुणीसोबत धक्कादायक प्रकार)
पीडितेच्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात पतीसह चौघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world