Pune Election News: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कसब्यातील प्रभाग 24 (कमला नेहरू रुग्णालय प्रभाग) मध्ये भाजपचे नेते गणेश बिडकर आणि शिवसेना (शिंदे गट) कडून रिंगणात असलेले प्रणव धंगेकर यांच्यातील लढत अत्यंत प्रतिष्ठेची ठरली आहे. अशातच, मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच पुण्यात गणेश बिडकर यांचे विजयाचे फलक झळकल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या 165 जागांसाठी आज (16 जानेवारी) मतमोजणी सुरू आहे. मात्र, पुण्याचे राजकारण ज्या कसब्यातून फिरते, तिथे निकालापूर्वीच चुरस पाहायला मिळत आहे. भाजपचे उमेदवार गणेश बिडकर हे नगरसेवक म्हणून निवडून आल्याचे आणि थेट 'महापौर साहेब' झाल्याचे बॅनर शहरात लावण्यात आले आहेत.
(नक्की वाचा- BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल उशिरा लागणार? उमेदवारांची धाकधूक वाढली)
Pune | पुण्यात निकाला आधीच 'महापौर साहेब'उल्लेख असलेले बॅनर, गणेश बिडकर यांचा 'महापौर साहेब'
— NDTV Marathi (@NDTVMarathi) January 16, 2026
नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदनचे बॅनर लागले आहेत.#PuneNews #ganeshbidkar #MaharashtraElection2026 #PoliticalNews #ndtvmarathi pic.twitter.com/QUev62Zbzn
बॅनरवर काय आहे?
बॅनरवर गणेश बिडकर यांचा उल्लेख 'महापौर साहेब' असा करण्यात आला आहे. नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देणारे हे फलक कार्यकर्त्यांच्या प्रचंड आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जात आहेत. पुण्यातील मध्यवर्ती भागात आणि बिडकर यांच्या प्रभाग 24 परिसरात हे बॅनर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.
(नक्की वाचा : BMC Election Result Exit Poll : बीएमसीचा 'किंग' कोण? भाजपची मुसंडी की ठाकरेंचा गड कायम; पाहा एक्झिट पोलचे आकडे )
बिडकर vs धंगेकर, अटीतटीची लढत
प्रभाग 24 मध्ये ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपचे पुण्याचे निवडणूक प्रमुख आणि अनुभवी नेते बिडकर यांना विजयाचा ठाम विश्वास आहे. तर प्रणव धंगेकर (शिवसेना शिंदे गट) हे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे सुपुत्र आहेत. कसब्यातील धंगेकरांचे वर्चस्व पाहता त्यांनी बिडकर यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. निवडणुकीच्या निकालाआधाच बिडकर यांच्या बॅनरबाजीची चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world