Pune News : फक्त दंड नाही तर गाडीच जप्त होणार, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात पुणे पोलीस आक्रमक

Pune Traffic Rule : अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी आता 'सोशल शेमिंग' आणि कडक कायदेशीर कारवाईचा अवलंब केला आहे. मद्यधुंद अवस्थेत सापडल्यास संबंधिताचे वाहन तात्काळ जप्त केले जाईल.

जाहिरात
Read Time: 2 mins

पुण्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी पुणे पोलिसांनी आता 'झिरो टॉलरन्स' धोरण स्वीकारले आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 1000 हून अधिक चालकांसाठी सोमवारी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात एका विशेष समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मद्यपी वाहनचालकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.

थेट वाहन जप्त होणार

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मद्यपी वाहनचालकांसाठी नवीन आणि अत्यंत कडक नियमावली जाहीर केली आहे. सोमवारी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आयोजित समुपदेशन शिबिरात त्यांनी स्पष्ट केले की, यापुढे केवळ दंड आकारून सोडले जाणार नाही, तर थेट वाहन जप्त केले जाईल. रस्ते सुरक्षा महिन्याचा भाग म्हणून हे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. 'टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

(नक्की वाचा-  Uttar Pradesh News: मोमोजचा 'नाद' नडला! लहान मुलाकडून 85 लाखांचे दागिने लुटले; नेमकं काय घडलं?)

शिस्त भंग करणाऱ्यांना कडक शिक्षा

अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी आता 'सोशल शेमिंग' आणि कडक कायदेशीर कारवाईचा अवलंब केला आहे. मद्यधुंद अवस्थेत सापडल्यास संबंधिताचे वाहन तात्काळ जप्त केले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना त्यांच्या मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत चौकाचौकात उभे केले जाईल. तसेच नियम भंग करणाऱ्यांचे फोटो पुणे पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले जातील, जेणेकरून समाजात धाक निर्माण होईल. संबंधित चालक जिथे काम करतो, त्या कार्यालयालाही या गुन्ह्याबाबत अधिकृतपणे कळवले जाईल.

(नक्की वाचा-  MLA Gopichand Padalkar New Song: "आमच्या नादाला लागण्याआधी...", गोपीचंद पडळकर यांचं नवीन गाणं प्रदर्शित)

अपघाताची भीषण आकडेवारी

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी देशातील रस्ते अपघातांची धक्कादायक माहिती दिली.  भारतात दरवर्षी सुमारे 1,80,000 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. म्हणजेच दररोज साधारण 400 लोक जीव गमावतात. दरवर्षी सुमारे 7 लाख लोक कायमस्वरूपी अपंग होतात.
 

Advertisement
Topics mentioned in this article