BJP MLA Gopichand Padalkar New Song: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. मात्र, आता त्यांनी आपला एक वेगळा पैलू जनतेसमोर आणला आहे. सध्या ते एका जबरदस्त गाण्यामुळे चर्चेत आले आहे, 2 फेब्रुवारी रोजी त्यांचे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. "आमच्या नादाला लागण्याआधी... एकदा होळकरशाही आठवा" असे या गाण्याचे बोल आहेत.
या गाण्याची निर्मिती अत्यंत भव्य दिव्य पद्धतीने करण्यात आली असून यात पडळकर स्वतः मुख्य भूमिकेत दिसत आहेत. गाण्याचे लेखन सचिन माळी यांनी केले असून गाणं मिलिंद शिंदे यांनी गायलं आहे. तर मिलिंद शिंदे, शीतल साठे आणि अनिकेत मोहिते यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. गाण्यातील नृत्य, कला दिग्दर्शन आणि गोपीचंद पडळकर यांचा पडद्यावरील वावर एखाद्या व्यावसायिक अभिनेत्याला टक्कर देणारा असल्याचे चाहते म्हणत आहेत.
सोशल मीडियावर प्रेक्षकांचा प्रतिसाद
गाणे रिलीज झाल्यापासून अवघ्या 24 तासांत याला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट बॉक्समध्ये समर्थकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
पडळकर नेहमीच धनगर समाज आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांवरून आक्रमक असतात. या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा होळकरशाहीच्या इतिहासाला उजाळा देत आपला स्वाभिमानी वारसा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे गाणे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याचे काम करत असल्याचे बोलले जात आहे.
पाहा VIDEO
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world