जाहिरात

पुण्याच्या प्रदूषणामुळे अनेकांनी गमावला जीव, लॅन्सेटच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड

लॅन्सेटमध्ये पुण्यातल्या प्रदूषणामुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे याची अभ्यास पूर्ण मांडणी केली आहे. 

पुण्याच्या प्रदूषणामुळे अनेकांनी गमावला जीव, लॅन्सेटच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड
पुणे:

'पुण्यातील प्रदूषण' हा कायमच चर्चेतला विषय राहिलेला आहे. विशेष म्हणजे जगातील विख्यात सायन्स जर्नलमध्येही याची दखल घेण्यात आली आहे. लॅन्सेटमध्ये पुण्यातल्या प्रदूषणामुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे याची अभ्यास पूर्ण मांडणी केली आहे. लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नलने एक अभ्यास प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये पुण्यासह भारतातील 10 प्रमुख शहरांमध्ये मृत्यूदरावर वायू प्रदूषणाचा परिणाम तपासण्यात आला. 

अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकत्ता, पुणे, शिमला आणि वाराणसी या दहा शहरांना प्रदूषणाचा विळखा आहे. भारतातील या दहा शहरात वायू प्रदूषणामुळे सात टक्के मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे. याचा अर्थ वायू प्रदुषणामुळे दरवर्षी या शहरांमध्ये 33 हजार जणांना आपले प्राण गमवावे लागत आहे. 

नक्की वाचा - पुणेकरांनो सावधान! 'झिका'चा धोका वाढला, आणखी दोघांना लागण

पुण्याशी संबंधित महत्त्वाचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे...

- 2008 ते 2019 पर्यंत, या 10 शहरांमध्ये दरवर्षी 33,000 पेक्षा जास्त मृत्यू PM2.5 प्रदूषण पातळीच्या संपर्कात आल्याने झाले होते. जे WHO च्या शिफारशी 15 मायक्रोग्राम प्रति घनमीटरपेक्षा जास्त होते

- त्या कालावधीत या शहरांमध्ये नोंदवलेल्या एकूण मृत्यूंपैकी 7.2% आहे.

- अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, शिमला आणि वाराणसी यासह पुणे 10 शहरांपैकी एक होते.

deaths due to pollution

- संशोधकांनी भारताला हवेच्या गुणवत्तेचे प्रमाण कमी आणि कडक करण्याची मागणी केली आहे. सध्याची 60 मायक्रोग्रॅम PM2.5 प्रति घनमीटरची शिफारस WHO मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा चारपट जास्त आहे.

हा अभ्यास पुण्यासारख्या प्रमुख भारतीय शहरांमध्ये वायू प्रदूषणाचा सार्वजनिक आरोग्यावरील महत्त्वपूर्ण परिणामांवर प्रकाश टाकतो. रहिवाशांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हवेच्या दर्जाची मजबूत धोरणे आणि हस्तक्षेपांची गरज व्यक्त केली जात आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com