वाढती वाहतूककोंडी आणि वाढते खड्डे हे पुणेकरांसाठी (Pune News) त्रासदायक विषय ठरले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी वाढत असल्यामुळे यावर प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान पुणे पोलीस उपायुक्तांकडून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आदेश देण्यात आहे. याअंतर्गत 12 ऑगस्टपर्यंत सकाळी 9 ते रात्री 10 या काळात शहरातील 25 मार्गांवर जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीत काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (Pune Traffic Jam)
पुणे शहरामध्ये पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. पावसाचं पाणी साचून राहिल्यामुळे रस्त्यांची वाहन क्षमता कमी झाली आहे. शहरातील रस्त्यांवरील जड वाहनामुळे देखील रस्त्याची वाहन क्षमता कमी झाली. वाहतूक कोंडी त्याचप्रमाणे नागरीकांच्या सुरक्षिततेला बाधा यामुळे निर्माण झाली आहे. वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्याकरीता पुणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमधील खालील चौकामधून पुढील रस्त्यांवर 12 ऑगस्टपर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर सर्व प्रकारच्या जड वाहनांना (डंपर, ट्रक, आर.एम.सी. मिक्सर व इतर) पुणे शहरामध्ये सकाळी 9 ते रात्री 10 दरम्यान प्रवेश बंद राहील.
नक्की वाचा - पुण्यातील प्रवास होणार सुसाट?, रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांचे महापालिकेला निर्देश
9 ते रात्री 10 यादरम्यान कोणत्या मार्गांवरील वाहनांना बंदी?
1. संचेती चौक जंगली महाराज रोडकडे, गणेशखिंड रोडकडे, कोर्ट रोडकडे
2. पौड फाटा चौक कर्वे रोड, डेक्कनकडे, लॉ कॉलेज रोडकडे
3. राजाराम पुल डी.पी. रोडकडे
4 दांडेकर पुल शास्त्री रोडकडे
5. निलायम ब्रिज ना.सी. फडके चौकाकडे
6. सावरकर पुतळा चौक बाजीराव रोडकडे
7. लक्ष्मी नारायण सिनेमा चौक जेधे चौकाकडे
8. सेव्हन लव चौक जेधे चौकाकडे
9. पंडोल अपार्टमेंट चौक महात्मा गांधी रोडकडे
10. खाणे मारूती चौक इस्ट स्ट्रीटकडे
11 . पॉवर हाऊस चौक मालधक्का चौकाकडे
12. आर.टी.ओ. चौक, शाहीर अमर शेख चौकाकडे
13. पाटील इस्टेट चौक आर.टी.ओ. चौकाकडे
14. ब्रेमेन चौक पणे विद्यापीठ चौकाकडे
15. शास्त्री नगर- गुंजन चौकाकडे
16. आंबेडकर चौक सदलबाबा चौकाकडे
17. चंद्रमा चौक सादलबाबा चौकाकडे
18. मुंढवा चौक ताडीगुत्ता चौकाकडे
19. नोवल चौक भैरोबानाला चौकाकडे
20. लुल्लानगर भैरोबानाला चौकाकडे
21. लुल्लानगर गोळीबार मैदान चौकाकडे
22. लुल्लानगर गंगाधाम चौकाकडे
23. पुष्पमंगल चौक ते जेधे चौककडे
२४. राजस सोसायटी महेश सोसायटी चौकाकड
25. पोल्ट्री चौक आरटीओ चौकाकडे
26. उंड्री एनआयबीएम कडे
27. पिसोळी हडपसर कडे
28. हांडेवाडी हडपसर कडे
29. अभिमानश्री चौक, बाणेर रोड पुणे विद्यापीठ चौकाकडे, पुणे विद्यापीठ चौकाकडे
30. अभिमानश्री चौक, पाषाण रोड