Rain Update : आजही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

पुढील दोन दिवसही काही भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

मान्सूनने परतीची वाट धरली आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने झोडपले आहे. याशिवाय मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातही (Heavy Rain) पावसाचा अंदाज आहे. कोकणातील काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुढील दोन दिवसही काही भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह रायगड जिल्ह्यात बुधवारी आणि पालघर जिल्ह्यात गुरुवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह अत्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

नक्की वाचा - दीड लाख पगार, विदेशात नोकरी; देशभरातून आलेल्या तरुणांची गर्दी पाहून पुणेकर अचंबित

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यात कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात (Maharashtra Rain Update) तुरळक ठिकाणी खूप जोरदार ते अत्यंत जोरदार पावसाची शक्यता असून 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहील. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुण्यातले चारही धरण पुन्हा एकदा तुडुंब भरले 
गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याने खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणं पूर्ण भरलेली आहेत. पुढील चार दिवस हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज दिला आहे.  त्यामुळे मुळा-मुठा नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर खडकवासला पाटबंधारे विभागे खबरदारी घेण्यास सांगितले आहे आणि नदीकाठी असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. पुणे महानगरपालिकेकडून नदी काठी असलेल्या परिसरात आणि सोसायट्यांमध्ये सूचना देण्यात आल्या आहेत.