जाहिरात

Political News: राज-उद्धव एकत्र येण्याची पहिलीच वेळ नाही, 2011 सालीही ठाकरे बंधू दिसले होते एकत्र

Raj and Uddhav Thackeray : बेघर गिरणी कामगारांच्या निवासस्थानाच्या मागणीला राज आणि उद्धव यांनी पाठिंबा दिला होता. ठाकरे बंधू गिरणी कामगारांसोबत स्वतंत्रपणे चालत गेले होते.

Political News: राज-उद्धव एकत्र येण्याची पहिलीच वेळ नाही, 2011 सालीही ठाकरे बंधू दिसले होते एकत्र

Political News : शालेय अभ्यासक्रमात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. येणाऱ्या 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सर्वपक्षीय मोर्चात एकत्र येणार आहेत. मात्र मनसेच्या स्थापनेनंतर राज आणि उद्धव ठाकरे मोर्चात एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील गिरणी कामगारांच्या मोर्चात दोन्ही भाऊ एकत्र दिसले होते. 

(नक्की वाचा- Hindi Controversy: राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देऊ नये, गुणरत्न सदावर्तेंची मागणी)

28 जुलै 2011 रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भायखळा ते गिरणगाव मार्गे आझाद मैदानापर्यंत निघालेल्या गिरणी कामगारांच्या मोर्चात सामील झाले. बेघर गिरणी कामगारांच्या निवासस्थानाच्या मागणीला राज आणि उद्धव यांनी पाठिंबा दिला होता. ठाकरे बंधू गिरणी कामगारांसोबत स्वतंत्रपणे चालत गेले होते. उद्धव ठाकरे इतर शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांसह मिरवणुकीच्या अग्रभागी सामील झाले होते. तर मनसेचे कार्यकर्ते त्यांचे नेते राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मागच्या बाजूला होते.

गिरणी कामगारांना मालकी हक्काची घरे देण्याचा मुद्दा महाराष्ट्र सरकारने बराच काळ प्रलंबित ठेवला आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने गिरणी कामगारांना मोफत घरे देण्याची घोषणा केली होती. परंतु, चव्हाण यांनी त्यांचे आश्वासन पूर्ण केले नाही. याविरोधात गिरणी कामगार संघटनेचे नेते आणि इतरांनी नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचा पाठिंबा मागितला होता.

(नक्की वाचा- Hindi Controversy: राज- उद्धव ठाकरेंचा मुंबईत 5 जुलैला एकत्र मोर्चा, हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधु एकटवले!)

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार

पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हिंदीविरोधात राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांचा एकच विराट मोर्चा निघेल असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. 5 जुलै रोजी राज ठाकरे यांचा मोर्चा निघणार आहे. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांचा 7 जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधातील आंदोलनात सहभगी होणार होते. अशातच आता हे दोन्ही मोर्चे एकाच दिवशी निघणार असल्याची मोठी घोषणा संजय राऊत यांनी केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com