
Shaktipeeth Mahamarg Protest: नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. अशातच या महामार्गासाठी 20787 कोटी रुपयांची तरतूद राज्य मंत्रिमंडळाने केली आहे. 20787 कोटी रुपयांची तरतूद राज्य मंत्रिमंडळाने केली आहे. या निर्णयानंतर शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील नेते आक्रमक झाले असून शक्तीपीठ महामार्गाविरोधात एक जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे–बोरीवली प्रवास अवघ्या 15 मिनिटांत, मुख्यमंत्र्यांनी दिली गुड न्यूज! वाचा सर्व अपडेट
समोर आलेल्या माहितीनुसार, शक्तिपीठ महामार्ग विरोधातील लढा तीव्र करण्यासाठी शेतकरी तसेच नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या महामार्गाविरोधातील आंदोलनाची रणनिती आखण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत 12 जिल्ह्यातील बाधीत शेतकऱ्यांसह राज्यातील इतरही शेतकरी उपस्थित होते.
गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादू नका, अशा तीव्र भावना या बैठकीत शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या असून 1 जुलैला कृषिदिनादिवशी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, खासदार विशाल पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, खासदार नागेश पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, आमदार दिलीप सोपल, आमदार चंद्रकांत नवघरे, आमदार प्रविण स्वामी हे नेते ऑनलाइन बैठकीत सहभागी होते.
( नक्की वाचा : Pune Metro : पुणेकरांचा प्रवास होणार आणखी फास्ट, मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी )
दरम्यान, या महामार्गासाठी राज्य सरकारने 20787 कोटी रुपयांची तरतूद राज्य मंत्रिमंडळाने केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना देखील सरकारने शक्तीपीठ साठी मोठे पाऊल उचलले आहे. कोल्हापूर जिल्ह्याला वळसा घालून शक्तिपीठ महामार्ग तयार केला जाणार आहे. वर्धा जिल्ह्यातल्या पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पत्रादेवी पर्यंत हा महामार्ग असणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world