Raj Thackeray-Uddhav Thackeray Unite: महाराष्ट्राच्या राजकारण 360 अंशांच्या कोनात फिरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. राजकीय व्यासपीठावर नाही मात्र मराठीच्या मुद्द्यावर तुर्तात हे दोन्ही भाऊ एकत्र येणार आहे. ठाकरे बंधुंच्या आक्रमक पवित्र्यानंतर हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही अध्यादेश मागे घेण्याची नामु्ष्की सरकारवर आहे.
राज आणि उद्धव ठाकरे यांचे जाहीर आमंत्रण
ठाकरे बंधुंच्या लढ्याला मिळालेल्या यशाचा विजयी मेळावा येत्या 5 जुलै रोजी होत आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितरित्या सर्वांना निमंत्रण दिलं आहे. येत्या 5 जुलै रोजी विजयी मेळावा होत आहे. वरळीच्या एन. एस. सी. आय. डोम येथे सकाळी या मेळाव्याला सुरुवात होणार आहे.
निमंत्रणात काय म्हटले आहे?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित निमंत्रण पत्र जारी केलं आहे. या पत्रात लिहिलंय की, "आवाज मराठीचा! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं ...! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत. बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या! आम्ही वाट बघतोय ...!"