राकेश गुडेकर
रत्नागिरीतल्या सारिका चव्हाण यांनी देहदानाचा संकल्प करत समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. आपल्या देहदानाचा अर्ज त्यांनी रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे दिला आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला, यामागे त्यांच्या काय भावना आहेत, शेजाऱ्यांना त्यांच्या या निर्णयाबाबत काय वाटतं? त्यांच्या या अर्जानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी नेमकं काय म्हटलं आहे. याचा संपुर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहोत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सारिका हरिश्चंद्र चव्हाण. रत्नागिरीतल्या कारवांचीवाडी इथल्या पारस नगर येथे त्या राहतात. दोन मुलं आणि त्या स्वतः असा त्यांचा परिवार आहे. मुलीचं लग्न झालं आहे. सारिका चव्हाण यांच्या एका निर्णयाने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. चव्हाण यांचे पती हरिश्चंद्र चव्हाण यांचा 2015 मध्ये खून झाला होता. त्यावेळी पतीच्या अस्थी विसर्जनाला त्या गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या बरोबर दोन मुलं होतं. अशी स्थिती कोणावर येऊ नये असे त्यांना वाटले. त्याच वेळी त्यांनी मनाशी ठरवलं आपण देहदान करायचं. पण त्यावेळी मुलं लहान होती. सपोर्टला कोणी नाही, त्यामुळे हा निर्णय अंमलात आणायला वेळ गेला. त्यांनी हा निर्णय आपल्या मुलांना समजावून सांगितला. त्यांनीही मग आईला समजून घेतलं आणि शेवटी या निर्णयावर एकमत झालं.
हेही वाचा - घाटकोपरमध्ये घडलेल्या या 5 घटनांनी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला
सारिका यांनी आपला देहदनाचा आपला हा निर्णय आपल्या बहिणींनाही सांगितला. सुरुवातीला त्यांनी विरोध केला. पण त्यांनाही सर्व गोष्टी त्यांनी पटवून दिल्या. नंदेचा मुलगा, माजी जिल्हा परिषद सभापती परशुराम कदम यांनाही हा निर्णय त्यांना सांगितला. त्यांनीही सारिका यांच्या निर्णयाचे स्वागत केले. 1 मे ला त्यांच्या पतीची जयंती असते. त्याच दिवशी त्यांनी या निर्णयाला अधिकृत रूप दिले. त्यानंतर दोन्ही मुलांसह परशुराम कदम यांच्या सोबत वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन तसा अर्ज दाखल केल्याचे सारिका चव्हाण यांनी सांगितलं.
हेही वाचा - घाटकोपर होर्डिंग प्रकरणात आणखी दोघांचा बळी; मृतांची संख्या चिंता वाढवणारी
देहदान करण्यामागे आपला दुसरा एक उद्देश होता. असंही त्या सांगतात. आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्या देहाला अग्नी दिला जातो. थोडक्यात काय तर आपल्या देहाचा काहीच उपयोग होत नाही. पण देहदान केलं तर आपल्या देहापासून किमान सात ते आठ लोकांना जीवदान मिळू शकतं. किमान नेत्रदान तरी होऊ शकतं. अगदीच काही उपयोग नाही झाला तर किमान वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तरी देहाचा उपयोग होईल, हा देखील विचार करून आपण देहदान करण्याचा निर्णय घेतल्याचं सारिका चव्हाण यांनी सांगितलं.
हेही वाचा - खासदार नवनीत राणांच्या घरी चोरी, कितीची कॅश पळवली? चोर कोण?
आपला जेव्हा मृत्य होतो, तेव्हा लोकं काय विचारतात की बॉडी कधी उचलणार आहेत, म्हणजे आपली ओळखच तिथे संपून जाते असं त्या म्हणाल्या. पण समजा आपण मरणोत्तर नेत्रदान केलं, तर आपली ओळख मरणानंतरही संपत नाही. आपली ओळख कायम राहते. आपले अवयव ज्या लोकांना उपयोगात येतील त्यांचे जे आशीर्वाद मिळतात ते आपल्या मुलांसाठी खूप लाख मोलाचे असतात असं सारिका चव्हाण यांनी सांगितलं.
हेही वाचा - PM मोदींच्या मुंबई दौऱ्यानिमित्त घाटकोपरमधील हे मार्ग राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते?
याबाबत सारिका चव्हाण यांच्या शेजारी राहणाऱ्या सुचिता देसाई यांनी सांगितलं की, चव्हाण वहिणींचा निर्णय अतिशय चांगला वाटला, आम्ही एवढा चांगला विचार करू शकलो नाही. एवढा चांगला विचार त्यांनी केला. त्यामुळे त्यांचा आदर्श आम्ही नक्कीच घेऊ. त्यांचे पती या जगात नाहीयेत, अशा परिस्थितीत मुलांना देखील त्यांचं निर्णयाला चांगली साथ दिली. त्यामुळे मुलांचंही अभिनंदन अशी प्रतिक्रिया सुचिता देसाई यांनी यावेळी दिली. तर तिथेच राहणाऱ्या माधुरी सावंत यांनीही सारिका चव्हाण यांच्या निर्णयाचं स्वागत करत त्यांच्या मुलांच कौतुक केलं आहे.
हेही वाचा - सिनेमा किंवा डान्स नाही तर 'या' माध्यमातून होते सनी लियोनची कमाई, वाचा 115 कोटींच्या संपत्तीचं रहस्य
आपल्या मृत्यूनंतर आपल्या देहाचा उपयोग समाजासाठी व्हावा हा अतिशय प्रगल्भ असा विचार सारिका चव्हाण यांचा आहे. विशेष म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सारिका चव्हाण यांचा देहदानाचा अर्ज दाखल झाल्याचे कळताच आणखी तीन लोकांनी देहदानासाठी अर्ज केल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांनी सांगितलं. तसेच यामुळे देहनाची जागरूकता आणि त्याचे महत्व पटण्यास खूप मदत होणार असल्याचं रामानंद यांनी सांगितलं. नेत्रदान, देहदान याबाबत समाजात जागरूकता होणं आवश्यक आहे. मृत्यूनंतर आपल्या देहाचा उपयोग समजाला होऊ शकतो या प्रगल्भ विचाराने सारिका चव्हाण यांनी घेतलेला हा निर्णय समाजापुढे एक आदर्शवत आहे.