जाहिरात
Story ProgressBack

खासदार नवनीत राणांच्या घरी चोरी, कितीची कॅश पळवली? चोर कोण?

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरी चोरी झाली आहे. राणा यांचे मुंबईत खार इथे घर आहे. याच घरात चोरी झाली आहे. याबाबत खार पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

खासदार नवनीत राणांच्या घरी चोरी, कितीची कॅश पळवली? चोर कोण?
मुंबई:

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरी चोरी झाली आहे. राणा यांचे मुंबईत खार इथे घर आहे. याच घरात चोरी झाली आहे. याबाबत खार पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राण यांच्या घरातून दोन लाखाची कॅश लंपास करण्यात आली आहे. ही चोरी दुसरी तिसरी कुणी नाही तर त्यांच्याच घरातल्या नोकराने केली आहे. पैसे घेऊन तो त्याच्या मुळगावी बिहारला पळाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे मुंबईतल्या खार येथे फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये अर्जून मुखिया हा घरगडी म्हणून काम करत होता. गेल्या दहा महिन्या पासून तो याच फ्लॅटवर राहात होता. तो मूळचा बिहारच्या दरभंगाचा रहिवाशी आहे. दिवसभर काम करुन तो तिथे राहत होता. मार्च महिन्यांत तो होळीनिमित्त त्याच्या गावी गेला. त्यानंतर तो परत आला नाही. राणा यांचा पीए संदीप सुभाष ससे यांच्यावर या फ्लॅटची जबाबदारी होती. त्यामुळे त्याने  अर्जून याला अनेकदा कॉल केला होता. मात्र त्याने कॉल घेतला नाही. फेब्रुवारी महिन्यांत घरखर्चासाठी रवी राणा यांनी त्यांना दोन लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी त्यांच्या कपाटात ठेवली होती. त्यांनी घरखर्चासाठी काही रक्कम काढण्यासाठी कपाट उघडले होते. यावेळी कपाटात दोन लाख रुपये नव्हते. संपूर्ण कपाटाची पाहणी करुनही त्यांना कुठेच पैसे मिळाले नव्हते. 

हेही वाचा - मूळचे नागपूरचे कर्नल वैभव काळे यांना गाझातील हल्ल्यात वीरमरण

या प्रकरणी खार पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही चोरी अर्जून यानेच केली असल्याचा संशय आहे. चोरी करून तो त्याच्या बिहारमधील दरभंगा या गावी पळून गेला आहे.  त्याच्या अटकेसाठी एक टिम तयार करण्यात आली आहे. ही टिम तिथे जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
कल्याण शीळ मंदिर अत्याचार-हत्या प्रकरण; आरोपींनी फाशी होण्यासाठी पाठपुरावा करु, रूपाली चाकणकरांचं आश्वासन
खासदार नवनीत राणांच्या घरी चोरी, कितीची कॅश पळवली? चोर कोण?
Nagpur police arrested MSME director Prashant Parlewar for murdering Pattewar along with sister
Next Article
सासऱ्याच्या हत्येमागे बहिणीसह MSME विभागाच्या संचालकांचा हात, दोघेही अटकेत
;