पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र घाटकोपर येथे येत असून त्यांचा रोड शोदेखील होणार आहे. अशोक सिल्क मिलपासून घाटकोपर पश्चिम ते पार्श्वनाथ चौक, घाटकोपर पूर्व येथील पार्श्वनाथ मंदिर असा नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचा मार्ग असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त घाटकोपरमधील काही मार्ग बंद करण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक विभागाने याबाबत माहिती दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणते मार्ग बंद असतील?
वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, उद्या (15 मे) लाल बहादूर शास्त्री मार्ग, गांधीनगर ते नौपाडा जंक्शन आणि माहुल घाटकोपर मार्ग, मेघराज जंक्शन ते आर बी कदम जंक्शन हे मार्ग दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहतील.
नक्की वाचा- PM Modi Net Worth : ना घर ना कार... पंतप्रधान मोदींची एकूण संपत्ती किती आहे?
अंधेरी-घाटकोपर मार्गावरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाक जंक्शन, हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स ते गुलाटी पेट्रोल पंप जक्शन, गोळीबार मैदान आणि घाटकोपर मेट्रो स्थानक ते सर्वोदया जंक्शन हे मार्ग दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत बंद असतील.
दि. १५ मे २०२४ रोजी लाल बहादूर शास्त्री मार्गावर रोड शो आयोजित केला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होणार आहेत.
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) May 14, 2024
येथील नजीकच्या मार्गांवर होणाऱ्या वाहनांच्या वर्दळीसाठी व गर्दीसाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी. #MTPTrafficUpdates pic.twitter.com/GvEgGb0tnP
नक्की वाचा- महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांविरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
पर्यायी मार्ग कोणते असतील?
- पूर्व द्रुतगती महामार्ग
- पश्चिम द्रुतगती महामार्ग
- अंधेरी-कुर्ला मार्ग
- साकी विहार मार्ग
- एमआयडीसी सेंट्रल रोड
- सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (SCLR)
- सायन-वांद्रे लिंक रोड
- जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world