प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी
Nashik School Colleges Closed Tomarrow : नाशिक जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे.नाशिकच्या 8 तालुक्यात शाळा, महाविद्यालयांना उद्या जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मालेगाव,नांदगाव,बागलाण,कळवण,पेठ,सुरगाणा,त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या 8 तालुक्यात अतिवृष्टी,ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आठवडी बाजार,सार्वजनिक कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.एनडीआरएफचे पथकही नाशिकमध्ये तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अतिवृष्टी, पूरस्थिती, भूस्खलन होण्याची शक्यता
नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात काही ठिकाणी अधिक पाऊस पडण्याची म्हणजेच अतिवृष्टी, पूरस्थिती, भूस्खलन होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाला,मालमत्तेस,सार्वजनिक पायाभूत सुविधांना तसेच प्राण्यांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळे आपत्तीपूर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
नक्की वाचा >> Jalgaon News: मासे पकडताना तरुणासोबत भयंकर घडलं, अंजनी नदीला पूर आल्यावर थेट झाडावरच चढला अन् नंतर..
खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव,नांदगाव,बागलाण,कळवण,त्र्यंबकेश्वर,इगतपुरी,पेठ,सुरगाणा या तालुक्यांमधील प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा,अंगणवाड्या,आश्रमशाळा,अनुदानित, विनाअनुदानित खासगी शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना 1 ऑगस्ट 2026 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world