रुमाल, बॅग ठेवून सीटवर ताबा घेणं बेकायदेशीर; मध्य रेल्वेची विशेष मोहीम, कुठे कराल तक्रार?

मध्य रेल्वेने अशा प्रकारे बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेणाऱ्यांविरोधात 'ऑपरेशन उपलब्ध' अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

रिझवान शेख, प्रतिनिधी

Mumbai News : रेल्वेतून प्रवास करताना अनेकांना सीट आरक्षित करण्याची सवय असते. टॉवेल, रुमाल किंवा बॅग शेजारच्या सीटवर ठेवून जागा रिझर्व्ह करून ठेवली जाते. मात्र ही पद्धत बेकायदेशीर आहे. मात्र काहीजण या मुद्द्यावरही इतर प्रवाशांशी हुज्जत घालतात. मात्र मध्य रेल्वेने अशा प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मध्य रेल्वेने मुंबईत ९९८ लोकांवर कारवाई केली असून यामध्ये ९८६ प्रवाशांना अटक आणि दंड ठोठावण्यात आला आहे. 

'ऑपरेशन उपलब्ध' अंतर्गत ‘टॉवेल स्प्रेडिंग'विरोधात कारवाई

मध्य रेल्वेच्या RPF कडून ‘टॉवेल स्प्रेडिंग' विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. सध्या मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू आहे. सुट्टीत लोक गावी जातात. मात्र अनेकांना तिकीट काढूनही सीट मिळणं कठीण होतं. अनेकदा ज्या स्थानकातून रेल्वे गाडी सुटते तेथूनच अनेक प्रवासी सीटवर रुमाल किंवा बॅग टाकून जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी पुढील स्थानकातून चढणाऱ्या प्रवाशांना जागा उपलब्ध होत नाही. मध्य रेल्वेने अशा प्रकारे बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेणाऱ्यांविरोधात 'ऑपरेशन उपलब्ध' अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.  मध्य रेल्वेच्या माध्यमातून ऑपरेशनअंतर्गत सर्वात जास्त मुंबईमध्ये 998 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यामध्ये 986 लोकांना अटक आणि दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे. या मोहिमेअंतर्गत आरक्षित डब्यांतील अनधिकृत प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यात आलं. प्रवाशांची आरक्षित सीट सुरक्षित करण्यासाठी मध्य रेल्वेकडून हा उपक्रम राबविण्यात आला. 

Advertisement

कुठे कराल तक्रार?

रेल्वेतून प्रवास करताना तुमच्यासमोर अशा प्रकारची घटना समोर आली, ज्यामध्ये रुमाल किंवा बॅगेच्या माध्यमातून प्रवासी दुसऱ्या व्यक्तीसाठी जागेचा ताबा घेत असेल तर १८२ वर डाएल करून तुम्ही रेल्वेकडे याबाबत तक्रार करू शकता. 

नक्की वाचा - बारावीत नापास झालेला तरुण मुंबईचा नवा सह पोलीस आयुक्त! कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी मनोज कुमारांवर...

अमली पदार्थ प्रकरणात १० आरोपींना अटक

13 प्रकरणांत 21.92 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून अमली पदार्थ प्रकरणात 10 आरोपींना अटक करण्यात आली. नागपूर विभाग गांजा तस्करीचा मोठा हॉटस्पॉट बनला असून 43.67 लाख रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला.  

Topics mentioned in this article