मनोज सातवी, पालघर
रिक्षा आणि बाईकच्या धडकेत एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी आहेत. पालघरमधील डहाणू-नाशिक राज्य मार्गावर वरोती ते सूर्यानगरदरम्यान ही घटना घडली आहे. जखमींमधील पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी गुजरातच्या वापी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर इतर दोघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संगीता डोकफोडे (वय 14 वर्ष) या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा या अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रिक्षा चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा समोरून येणाऱ्या दुचाकीवर धडकली. धडकेनंतर रिक्षा तेथील कालव्याच्या कठड्यावरुन उलटली. याप्रकरणी अधिक तपास कासा पोलीस करत आहेत.
(नक्की वाचा - नागरिकांनीही प्रयत्न केला, पण सर्व व्यर्थ; भुशी डॅमसारखी परिस्थिती उद्भवली तर कसा कराल बचाव?)
अपघातात जखमी झालेल्यांची नावे
अंकिता राजेश हाडळ, नयना राजेश हाडळ, लता वेडगा, प्रमोद सुरेश लोहार, कैलास धानमेर (दुचाकी चालक) या पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना वापी येथे नेण्यात आले आहे. तर रमेश कोदे, रसिका कोदे, भास्कर डोकफोडे हे देखील जखमी आहेत.
नक्की वाचा- वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली; मित्रांनीच केली बर्थडे बॉयची हत्या
पालघर पोलिसांनी याबाबत माहिती दिली की, रिक्षा रस्त्यात थांबल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या बाईकने जोरदार धडक दिली. यामध्ये संगीता डोकफोडे या मुलीचा मृत्यू झाल आहे. तर इतर सहा जण जखमी आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर घटनेचा तपास सुरु आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world