Rahit Pawar on Ajit Pawar Plane Crash: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून पुन्हा एकदा खळबळजनक दावे केले आहेत. या प्रकरणात 'VSR' कंपनी आणि भाजपशी संबंधित एका 'पेड ट्रोलर'चा उल्लेख केला आहे. या ट्रोलर्सना आपली खाजगी माहिती कशी मिळते, यावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आधार कार्ड आणि गोपनीय माहिती फुटली?
रोहित पवार यांनी आयटी सेलच्या एका पेड ट्रोलरवर गंभीर आरोप केले आहेत. माझे आधार कार्ड आणि क्रिकेटपटू रोहित शर्माबद्दलची माहिती विनापरवाना पोस्ट केली गेली. माझे आधार कार्ड या ट्रोलर्सकडे आलेच कसे? असा सवाल त्यांनी केला. विमान मंत्रालय की 'VSR' कंपनी, यापैकी कोणी ही माहिती आयटी सेलला पुरवली का? असा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. विमानतळ प्राधिकरणाची गुप्त माहिती ट्रोलर्सकडे कशी पोहोचते, याची चौकशी व्हावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
(नक्की वाचा- Ajit Pawar News: घात की अपघात? अजित पवारांच्या विमान अपघाताचं गुढ उलगडणार? सरकारचा मोठा निर्णय)
समीत ठक्करच्या 'त्या' ट्विटवरून वाद
रोहित पवारांनी भाजपशी संबंधित सुमीत ठक्कर यांच्या एका जुन्या ट्विटचा संदर्भ दिला. "अजितदादांच्या अपघाताच्या दोन दिवस आधी 'महाराष्ट्रात काहीतरी मोठे घडणार आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो', असे ट्विट या ट्रोलरने केले होते. जे ट्वीट 7-8 मिनिटात लगेच डिलीट केले होते. हे ट्विट कोणी कोणी रि-ट्विट केले होते?" असा सवाल रोहित यांनी केला. "समीत ठक्करला आम्ही सोडणार नाही", असा इशारा देखील रोहित पवारांनी दिला आहे.
(नक्की वाचा- Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)
लोकांना शंका येऊ लागली आहे
रोहित पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले. "मी अजित दादांच्या घातपाताचा विषय मांडतोय, मग भाजपशी संबंधित लोक मला ट्रोल का करत आहेत? यामुळे सामान्य जनतेच्या मनात वेगळीच शंका निर्माण होत आहे. मला वेड लागलंय असं दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हो, मला माझ्या काकांच्या बाबतीत नेमकं काय घडलं, हे शोधण्याचं वेड लागलंय आणि मी ते शोधूनच काढणार," अशी आक्रमक भूमिका रोहित पवारांनी घेतली आहे. घेतली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world