Who is Shweta Singh: रोहित पवारांच्या निशाण्यावर असलेल्या श्वेता सिंग कोण? महाराष्ट्राशी काय आहे कनेक्शन?

Who is Shweta Singh: अजित पवार यांच्या विमान अपघात चौकशीत 'डीजीसीए'मधील अधिकारी श्वेता सिंग अडथळे आणत असल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केला असून, या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Who is Shweta Singh: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केले आहेत. या प्रकरणातील चौकशी निष्पक्ष होत नसल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. ज्या कंपनीचे विमान अपघातग्रस्त झाले त्या VSR Aviation ला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची भीती रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांच्या आरोपांमध्ये श्वेता सिंग यांचं नाव वारंवार येत आहे, त्या नेमक्या कोण आहेत याबद्दल माहिती घेऊयात.

विमानाची माहिती नसलेले लोक चौकशीत- रोहित पवार

रोहित पवारांनी चौकशी समितीच्या पात्रतेवरही प्रश्न उपस्थित केले, "विमान नीट आहे की नाही हे तपासले जात नाही. ज्यांना विमानांची पुरेशी माहिती नाही, अशा लोकांचा चौकशी समितीत समावेश आहे," असा आरोप त्यांनी केला. चौकशी योग्य दिशेने जाऊ दिली जात नसल्याचे सांगत त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

(नक्की वाचा-  कोकणवासियांसाठी खुशखबर! मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी 1 मार्चपासून सेवेत; चेक करा वेळापत्रक आणि तिकीट)

श्वेता सिंग यांच्यावर गंभीर आरोप

रोहित पवार यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातील (DGCA) मुख्य फ्लाईट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर कॅप्टन श्वेता सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे. "श्वेता सिंग या डीजीसीए मधून मोठे रॅकेट चालवत आहेत. त्यांना या पदावरून तातडीने हटवावे," अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. श्वेता सिंग या भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे चिरंजीव राहुल महाजन यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी होत्या, याचा उल्लेख करत रोहित पवारांनी त्यांच्या राजकीय संबंधांकडे बोट दाखवले आहे.

(नक्की वाचा-  Badlapur News: बदलापूर हादरलं! पैशांचे आमिष दाखवून महिलांसोबत भयंकर कृत्य! 3 महिलांना अटक)

कोण आहेत कॅप्टन श्वेता सिंग?

कॅप्टन श्वेता सिंग या भारतातील एक नामवंत वैमानिक आणि विमानसुरक्षा तज्ज्ञ आहेत. डीजीसीए (DGCA) मध्ये चीफ फ्लाईट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर(CFOI) या उच्च पदावर कार्यरत आहेत. जेट एअरवेजमधून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या श्वेता सिंग यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक सेफ्टी ऑडिट्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचा विवाह अभिनेता राहुल महाजन यांच्याशी झाला होता, मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला.

Advertisement

अजित पवार यांच्या सुरक्षिततेशी निगडित असलेल्या या प्रकरणातील आरोपांमुळे आता केंद्र सरकार आणि डीजीसीए काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.