मुख्यमंत्री केले नाही या धक्क्यातून एकनाथ शिंदे अजून सावरले नाहीत. पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी ते धडपडत आहेत, अशी टीका सामनाच्या 'रोखठोक'मधून संजय राऊत यांनी केली आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या विसंवाद आहे. आपल्या मारामारीत प्रशासन व जनतेचे किती हाल होत आहेत त्याची फिकीर त्यांनी नाही, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
एकनाथ शिंदे यांच्याच आमदाराने शिंदे नाराज असल्याची माहिती दिल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. मुख्यमंत्रिपद मिळाले नाही म्हणून शिंदे समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत. शून्यात गेले आहेत. मनाने कोलमडले आहेत, अशी शिंदेंच्याच एका आमदाराने सांगितल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमित शाहांकडून फसवणूक
"निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढवू व 2024 नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका. निवडणुकीच्या काळात सढळ हस्ते खर्च करा, असे आश्वासन अमित शाह यांनी शिंदे यांना दिले होते. त्यामुळे शिंदे यांनी प्रचंड पैसा निवडणुकीत टाकला, पण शाह यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही व आपली फसवणूक झाली असे शिंद यांना वाटत आहे", असं शिंदेंच्या आमदाराने सांगितल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.
(नक्की वाचा- Ambarnath News : फोटोग्राफरसोबत 'हेरा फेरी'; डबलच्या नादात 50 हजारांचा गंडा)
शिंदेंचे कामात मन रमत नाही
मुख्यमंत्री फडणवीस आपल्याला विचारत नाहीत या दुःखात शिंदे आहेत. फडणवीस व शिंदे यांच्यात वरवरचे बोलणे आहे व मंत्रिमंडळांच्या बैठकांनाही उपमुख्यमंत्री शिंदे हजर राहत नाहीत हे सत्य आहे. दुःखाचा कडेलोट झाला की, उपमुख्यमंत्री शिंदे हेलिकाप्टरने साताऱ्यातील दरेगाव गाठतात व डोके थोडे शांत झाले की, ठाण्याला परत येतात. एकनाथ शिंद यांचे मनःस्वास्थ्य आता इतके बिघडले आहे की, ते आता आमदारांवरच चिडचिड करतात. त्यांचे कामात मन रमत नाही, असा खुलासा त्यांच्याच एका आमदाराने केल्याचं संजय राऊतांनी रोखठोकमध्ये सांगितलं.
(नक्की वाचा- Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय? आकडेवारी आली समोर)
"एकनाथ शिंदे यांच्या बहुतेक आमदारांमध्ये आता चलबिचल आहे. त्यातील एक मोठा गट थेट भाजपात जाऊन देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारण्याच्या तयारीत आहे. तर दुसरा गट शिंदेंवर दबाव आणत आहे. झाले गेले विसरून पुन्हा स्वगृही परतू, या चर्चा जोरात आहेत, पण केंद्रीय तपास यंत्रणांच्या भयामुळे नेते निर्णय घेत नाहीत व गुलियन बारी सिन्ड्रोमच्या आजाराप्रमाणे हातापायांना आणि मेंदलाही मंग्या आल्याचा भास या सगळ्यांना होतो आहे", अशी टीका रोखठोकमधून करण्यात आली आहे.