
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. शेवटचा टप्पा लवकरच नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. भिवंडी आणि इगतपुरी दरम्यानच्या शेवटच्या 76 किमीच्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. येत्या 2 मे रोजी तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. TOI याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई-नाशिक अंतर कमी होणार
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्पा सुरु झाल्यानंतर मुंबई-नाशिक अंतर देखील एका तासाने कमी होणार आहे. तर मुंबईहून नाशिक अवघ्या 8 तासात पोहोचता येणार आहे. 701 किमीचा हा संपूर्ण हाय-स्पीड कॉरिडॉर मुंबई, नाशिक आणि नागपूरला जोडतो.
भिवंडीतील इगतपुरी आणि आमणे गावादरम्यानचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा भाग हा सह्याद्रीच्या खडकाळ भूप्रदेशातून जातो. डोंगरांचा खडकाळ भाग, दऱ्या-खोऱ्यावर पूल बांधली, बोगदे तयार करणे असा सर्वात आव्हानात्मक हा तिसरा टप्पा आहे.
(नक्की वाचा- Railway News : बदलापूरहून अर्ध्या तासात नवी मुंबई गाठता येणार; रेल्वेच्या नव्या मार्गाला मंजुरी)
तिसऱ्या टप्प्याची वैशिष्टे
समृद्धी महामार्गावरील तिसऱ्या टप्प्यात 5 बोगद्यांचा समावेश आहे. याची एकत्रित लांबी 11 किमी आहे. इगतपुरीचा बोगदा 8 किमीचा असून जगातील सर्वात रुंद बोगदा आहे. यामुळे कसारा घाटाचे अंतर 25 मिनिटांवरून 8 मिनिटांवर येणार आहे. बोगद्यात अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली आहे.
(नक्की वाचा- सिडकोसमोर मोठे संकट! 21,000 विजेत्यां पैकी किती जणांनी भरली कन्फर्मेशन अमाऊंट?)
10 जिल्ह्यांतून जाणार महामार्ग
समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा,अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, ठाणे या जिल्ह्यांमधून जातो. समृद्धी महामार्गावर जवळपास 50 उड्डाणपूल, 5 बोगदे, 300 वाहनांसाठीचे अंडरपास आणि 400 पादचारी अंडरपास यांचा समावेश आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world